मुंबई : महाराष्ट्रासह देशात (Maharashtra Corona Omicron Update) वाढत चाललेल्या कोरोना आणि ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर केंद्रासह राज्य सरकार सतर्क झाले आहेत. राज्यात पुन्हा निर्बंध लागू करण्यात येणार हे काल निश्चित झालं आहे. त्यानुसार आज, शुक्रवारपासून नवे निर्बंध घोषित होणार आहेत. याबाबत आज नियमावली जाहीर करण्यात येईल.


राज्यातल्या कोविड रुग्ण संख्येत होणारी वाढ लक्षात घेता संसर्ग रोखण्यासाठी कशाप्रकारे निर्बंध लावता येतील यावर काल मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत टास्क फोर्स सदस्यांची बैठक झाली. या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मार्गदर्शन केले. आगामी नाताळ, नववर्ष स्वागत असे प्रसंग लक्षात घेऊन कमीतकमी गर्दी कशी होईल तसेच विवाह समारंभ, पार्ट्या या अनुषंगाने हॉटेल्स आणि उपाहारगृहात होणाऱ्या गर्दीवर कसे निर्बंध लावता येतील यादृष्टीने विस्तृत चर्चा करण्यात येऊन याबाबत आज 24 रोजी नवी नियमावली जाहीर करण्याचे ठरले आहे. 


काल झालेल्या बैठकीत इतर राज्यांनी  लावलेल्या निर्बंधांवर तसेच युरोप, अमेरिकेत कोरोनाची वाढत्या संख्येवर चर्चा करण्यात आली. मुख्य सचिव देवशीष चक्रवर्ती, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार डॉ दीपक म्हैसेकर, पालिका आयुक्त इकबालसिंह चहल, वैद्यकीय शिक्षण सचिव सौरभ विजय, टास्क फोर्सचे डॉ संजय ओक, डॉ शशांक जोशी, डॉ अजित देसाई, डॉ राहुल पंडित आदींनी सहभाग घेतला व सूचना केल्या होत्या.


पंतप्रधान मोदींनी राज्यांना दिले निर्देश
ओमायक्रॉन व्हेरियंटचा धोका पाहून केंद्राकडून राज्यांना काही आदेश देण्यात आले आहेत. केंद्रीय आरोग्य सचिवानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यांशी सवांद साधला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यांना महत्वाच्या सूचना दिल्या.



  • रात्रीची संचारबंदी लावा.

  • गर्दीच्या कार्यक्रमांना, ठिकाणांवर निर्बंध आणावेत.

  • उत्सव लक्षात घेऊन रुग्ण वाढले असतील तर कंटेन्मेंट झोन, बफर झोन तयार करा.

  • टेस्टिंग आणि संपर्कात आलेल्यांवर लक्ष ठेवा. केंद्राच्या मार्गदर्शक सूचनेनुसार डोअर टु डोअर जाऊन रुग्णांचा शोध घ्यावा.

  • हॉस्पिटलमध्ये बेड, आरोग्य उपकरणं, अॅम्बुलन्स वाढवा, ऑक्सिजनचा बफर स्टॉक बनवा, 30 दिवसांचा औषधांचा साठा करावा.

  • अफवा पसरु नयेत याची काळजी घ्यावी, 100 टक्के लसीकरणावर लक्ष केंद्रीत करावं.

  • दारोदारी जाऊन लसीकरण मोहीम राबवावी. 


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha



इतर महत्त्वाच्या बातम्या :


ओमायक्रॉनचा संसर्ग वाढतोय, रात्रीची संचारबंदी लावा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे राज्यांना आदेश


ओमायक्रॉनचं संकट! राजधानी दिल्लीत सतर्कता; नाताळ, नवीन वर्षाच्या कार्यक्रमांवर बंदी 


Omicron : राज्यात ओमायक्रॉन रुग्णांच्या आकडेवारीत उच्चांकी वाढ, 23 नव्या ओमायक्रॉनबाधितांची नोंद