Chocolate Day 2025 Wishes: व्हॅलेंटाईन डे अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलाय. मात्र त्यापूर्वी 7 फेब्रुवारीपासून व्हॅलेंटाईन वीकला सुरूवात झाली आहे. याचा 3 दिवस हा चॉकलेट दिन म्हणून साजरा केला जातो. चॉकलेट डे हा प्रेम आणि गोडपणाने भरलेला एक खास दिवस आहे, जेव्हा लोक त्यांच्या जोडीदारांना चॉकलेट देऊन त्यांच्या भावना व्यक्त करतात. चॉकलेट हा केवळ खाद्यपदार्थ नाही तर आनंद द्विगुणित करणारी एक अनुभूती आहे. तुम्ही तुमच्या जोडीदाराला खास पद्धतीने चॉकलेट डेच्या शुभेच्छा देऊन त्याचा दिवस आणखी सुंदर करू शकता. आज आम्ही तुम्हाला अनेक अप्रतिम शुभेच्छा सांगत आहोत, जे वाचून तुमच्या जोडीदाराचा दिवस चांगला जाईल आणि त्यांना आनंदी पाहून तुम्हालाही बरे वाटेल. तसेच या शुभेच्छांसोबत तुमच्या जोडीदाराला चॉकलेट गिफ्ट करायला विसरू नका. आजच्या खास दिवशी जोडीदाराला चॉकलेटसह गोड शुभेच्छाही द्या..


‘Five Star’ सारखी दिसतेस,
‘Munch’ सारखी लाजतेस, 
‘Cadbury’ सारखी जेव्हा पण तू हसतेस, 
‘Kit-Kat’ ची शपथ, 
तेव्हा तू खूप सुंदर दिसतेस… 
Happy Chocolate Day! 



किटकॅट चा स्वाद आहेस तू..
डेरिमिल्क सारखी स्वीट आहेस तू..
कॅडबरी पेक्षाही खास आहेस तू..
काहीही असो माझ्यासाठी,
फाय स्टार आहेस तू…
हॅपी चॉकलेट डे



या चॉकलेटमध्ये दडलीय माझी मन की बात,
तुझ्याकडून येऊ दे आपल्या नात्याला होकार
तुझ्या येण्याने माझ्या आयुष्याला येईल आकार
हॅपी चॉकलेट डे



जीवनरूपी पुस्तकातील काही पाने असतात खास
काही असतात आपली तर काही परकी
प्रेमाने आयुष्य राहते तेव्हाच छान-सुंदर
जेव्हा नातं होतं चॉकलेटसारखे गोड-मधुर
Happy Chocolate Day



माझ्या प्रिये, तू चॉकलेटच्या तुकड्यासारखी आहेस,
जितका काळ तू माझ्याबरोबर राहशील 
तितके माझे आयुष्य गोड होईल!
चॉकलेट डेच्या शुभेच्छा!



जेव्हा व्यक्त होण्यासाठी शब्द नसतात,
तेव्हा चॉकलेट तुमची भावना बोलून दाखवू शकते..


माझ्या जगात कोणत्याही चॉकलेटपेक्षा तू गोड आहेस.
माझ्या आयुष्यात गोडवा पसरवल्याबद्दल तुझे खूप खूप आभार प्रिये…
तुला चॉकलेट दिनाच्या खूप खूप शुभेच्छा!


पैशाने आनंद विकत घेता येत नाही,
परंतु ते चॉकलेट विकत घेता येतं,
आणि हे दोन्हीही सारखंच आहे…
चॉकलेट डेच्या शुभेच्छा!



हा चॉकलेटी संदेश आहे.
‘डेअरी मिल्क’ व्यक्तीसाठी…
एका ‘फाइव्ह स्टार’ स्वभावासाठी.
एका ‘मेलडी’ आवाजासाठी…
आणि एका ‘किटकॅट’ वेळेसाठी…
तुला चॉकलेट डेच्या खूप खूप शुभेच्छा!


चॉकलेटसारखा गोडवा तू, 
थोडासा जाणवणारा कडवटपणा मी
जो तुझ्याजवळ येणाऱ्या मुंग्याना लांब ठेवतो,
चॉकलेटसारख्या आपल्या या नात्याला 
वेगळं करणं केवळ अशक्य…
हॅपी चॉकलेट डे



तुला पाहता क्षणी भुललो तुझ्या प्रेमात,
गोडवा आणि प्रेम राहो आपल्या नात्यात,
हवी ती चॉकलेट ठेवेल तुझ्या पुढ्यात होकार कळव
मला या क्षणात चॉकलेट दिवसाच्या गोड गोड शुभेच्छा



आयुष्य खूप खास असतं,
जेव्हा कोणी आपलं होतं,
कानावर पडतो सडा शब्दांचा,
चॉकलेटने वाढतो गोडवा प्रेमाचा..
चॉकलेट दिवसाच्या शुभेच्छा



गोड व्यक्तीसारखी नेहमी जवळ रहा
आयुष्याचे मधुर गीत गात राहा
नात्यातील गोडवा टिकून राहण्यासाठी
चॉकलेटडे च्या शुभेच्छा स्वीकार करा


प्रेम हे सुंगधित, 
मऊ आणि गोड असतं.
एका नजरेत चॉकलेटप्रमाणे वितळतं…
हॅपी चॉकलेट डे



मला हाक न मारता मी तुझ्या समोर येईन,
वचन दे असे की मैत्री तू सुद्धा निभावशील,
परंतु असे नाही फक्त रोज आठवण काढशील,
फक्त लक्षात ठेव जेव्हा तू एकट्यात डेरिमिल्क खाशील
हॅपी चॉकलेट डे



हृदय तुझे,
एका गोड चॉकलेट सारखे नाजूक,
त्यात तू एका ड्राय फ्रुटचा तडका
तूच आहेस माझ्या हृदयाचा तुकडा”
Happy Chocolate Day



हृदय आमचे चॉकलेटसारखे नाजूक
तू त्यात dry फळांचे तूप साजूक …
चॉकलेट डेच्या शुभेच्छा



तुझ्यासाठी खास पाठवल्या आहेत या शुभेच्छा…
डार्क चॉकलेटमध्ये बुडवून आणि प्रेमाने सजवून..
हॅपी चॉकलेट डे


हेही वाचा>>>


Rose Day: रोझ डे!  प्रेम व्यक्त करण्यासाठी गुलाबाचंच फूल का दिलं जातं? कारण जाणून व्हाल थक्क! अनेकांना माहीत नाही


(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )