Rose Day 2025: ज्याला आपलं प्रेम व्यक्त करायचंय? किंवा प्रेमी युगूल ज्या दिवसांची आतुरतेने वाट पाहतात, तो व्हॅलेंटाईन वीक आजपासून सुरू झाला आहे. तसं पाहायला गेलं तर वाढदिवस आणि लग्न समारंभात फुलं देणं ही एक सामान्य गोष्ट झाली आहे. व्हॅलेंटाईन वीकमध्येही बहुतेक लोक आपल्या जोडीदारांना फुलं आणि भेटवस्तू देतात. आजपासून म्हणजेच 7 फेब्रुवारीपासून व्हॅलेंटाईन वीक सुरू झाला आहे. हा प्रेमाचा आठवडा रोझ डे म्हणजेच गुलाबाने सुरू होतो. या दरम्यान लोक प्रेम व्यक्त करण्यासाठी जोडीदाराला गुलाब देतात. पण काही लोकांच्या मनात हा प्रश्न येतो की, प्रेम व्यक्त करण्यासाठी फक्त गुलाबाचे फूल का दिले जाते? यामागचे कारण जाणून तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल..
प्रेम व्यक्त करण्यासाठी गुलाबाचंच फूल का दिलं जातं?
लाल गुलाब हे आदर आणि प्रेमाचे प्रतीक मानले जाते. जेव्हा जोडपे त्यांचे प्रेम व्यक्त करतात, तेव्हा ते एकमेकांना लाल गुलाब देतात. यामागे अनेक कथा आहेत. असे म्हटले जाते की, नूरजहानला लाल गुलाब खूप प्रिय होती. त्यामुळे नूरजहानला खुश करण्यासाठी मुघल सम्राट जहांगीर तिला रोज एक ताजे गुलाबाचे फूल देत असे. याशिवाय राणी व्हिक्टोरियाने पती प्रिन्स अल्बर्टला गुलाब भेट देऊन तिचे प्रेम व्यक्त केले. तेव्हापासून रोझ डे साजरा केला जाऊ लागला असल्याचे मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटले आहे.
लाल गुलाबांमध्ये काय विशेष आहे?
लाल गुलाब हे प्रेमाचे प्रतीक मानले जाते. त्याची खासियत म्हणजे त्याचा रंग लाल आहे, जो ऊर्जा, आकर्षण आणि प्रेमाचे प्रतीक आहे. कोणत्याही व्यक्तीला लाल गुलाब देणे दृढ भावना व्यक्त करते. हे एक खरं प्रेम आणि आदर यांचे प्रतीक म्हणून स्वीकारले जाते. लाल गुलाबाचे फूल तुमच्या मनातील भावना शब्दांशिवाय व्यक्त करते. व्हॅलेंटाईन वीकमध्ये रोझ डे च्या दिवशी तुम्ही तुमच्या जोडीदाराला लाल गुलाब देऊन तुमचे प्रेम व्यक्त करू शकता.
आजपासून व्हॅलेंटाईन वीकला सुरूवात
- 7 फेब्रुवारी- रोज डे (Rose Day 2025)
- 8 फेब्रुवारी- प्रपोज डे (Propose Day 2025)
- 9 फेब्रुवारी- चॉकलेट डे (Chocolate Day 2025)
- 10 फेब्रुवारी- टेडी डे (Teddy Day 2025)
- 11 फेब्रुवारी- प्रॉमिस डे (Promise Day 2025)
- 12 फेब्रुवारी- हग डे (Hug Day 2025)
- 13 फेब्रुवारी- किस डे ( Kiss Day 2025)
- 14 फेब्रुवारी- व्हॅलेंटाईन डे ( Valentines Day 2025)
हेही वाचा>>>
Valentine Day 2025 Week: यंदाचा 'व्हॅलेंटाईन वीक' खास! कोणत्या दिवशी काय कराल? संपूर्ण यादी पाहा अन् तयारी सुरू करा
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )