Health : लहानपणी आपल्याला सारखं सांगण्यात येत असायचं की नखं खाण्याची सवय ही वाईट सवय आहे. पण ही सवय नेमकी का वाईट आहे हे कोणीच सांगत नाही. असं सांगणाऱ्या प्रत्येकालाच माहित होतं की नखं खाणं हे आरोग्यासाठी चांगलं नाही. पण त्याचे आरोग्यावर किती गंभीर परिणाम होतात हे अनेकांना माहित नाही.
नखे चावण्याच्या सवयीमुळे बॅक्टेरियल इन्फेक्शन होण्याची शक्यता असते. ज्यामुळे चेहर्यावर लालसरपणा, सूज इत्यादी समस्या उद्धवू शकतात. इतकेच नाही तर कधीकधी नखे दाताने चावण्याच्या सवयीमुळे नखांखाली बॅक्टेरिया इन्फेक्शनमुळे पू होण्याची शक्यता असते आणि त्यामुळे असह्य वेदना देखील होऊ शकतात.
नखांवर परिणाम
नखे चावण्याची सवयीमुळे नखांच्या आतील टिशू खराब होण्याची शक्यता असते. ज्यामुळे कायमचे नखे कायमचे खराब होऊ शकतात. नखे चावण्याच्या सवयीमुळे बर्याच वेळा नखांची वाढ होणे थांबते. जर ही समस्या एकदा झाली तर त्याचे निराकरण करणे अशक्य होते.
दातांची समस्या उद्भवण्याची शक्यता
ज्यांना नखे चावण्याची सवय असते त्यांच्या समोरच्या दातांमध्ये अनेक समस्या निर्माण झाल्याचं आढळलं आहे. यामुळे दात कमकूवत होऊ शकतात, दातांमध्ये फट निर्माण होऊ शकते आणि दातामध्ये डागदेखील पडून शकतात. यामुळे दात सैल होणे आणि दात पडण्याचा देखील धोका असतो. या सवयीमुळे हिरड्यांवर देखील वाईट परिणाम होण्याची शक्यता असते.
बालपणात नखे चावण्याची सवय वेळेत सोडली गेली नाही तर दात वाकडेतिकडे होऊ शकतात. नखे चावण्याच्या सवयीमुळे दात सैल होतात. दातांची पकड सैल झाल्याने ते त्यांचा आकार बदलतात. बालपणाच्या या सवयीमुळे त्या व्यक्तीला नंतर दातांवर ब्रेसेस घालण्याची गरज लागते.
महत्वाच्या बातम्या :
- Hop-Shoots Cultivation | 'या' भाजीच्या एका किलोची किंमत आहे तब्बल एक लाख रुपये, बिहारच्या तरुणाचा अनोखा प्रयोग
- LinkedIn देणार आपल्या 15,900 कर्मचाऱ्यांना 'रिचार्ज' होण्यासाठी एक आठवड्याची पगारी रजा
- WHO | जगातल्या तीन पैकी एक महिला लैंगिक हिंसाचाराची बळी; WHO चा धक्कादायक अहवाल