Breakfast For Wight Loss : लठ्ठपणा (Obesity) ही एक गंभीर समस्या झाली आहे. सतत बाहेरचं खाणं, वेळेवर न जेवणं, जंकफूडचं अतिसेवन यांसारख्या गोष्टींमुळे लोकांची जीवनशैली बिघडत चालली आहे. परिणामी वजन वाढण्याची समस्या निर्माण होतेय. लठ्ठपणामुळे तुमचे शारीरिक सौंदर्य कमी होते यात शंका नाही पण त्याचा सर्वात मोठा परिणाम त्यामुळे होणाऱ्या आजारांवर होतो. वाढत्या लठ्ठपणामुळे मधुमेह, कर्करोग, बीपी, थायरॉईड इत्यादी असंख्य आजारांचा धोका वाढतो.


वजन कमी करण्यासाठी काय खावे? 


न्याहारीमध्ये प्रथिने, फायबर, कॅल्शियम इत्यादी सर्व पोषक घटकांचा समावेश असावा. नाश्त्यामध्ये तुम्ही खालील गोष्टींचा समावेश करू शकता.


मोड आलेले मूग 


तुम्हाला जर वजन कमी करायचं असेल तर नाश्त्यात मोड आलेले मूग खा. हा नाश्ता प्रथिने आणि फायबरने समृद्ध आहे. हे खाल्ल्याने वजन तर कमी होतेच. पण, त्याचबरोबर कोलेस्ट्रॉल कमी होऊन रक्तातील साखर नियंत्रित राहते. मूग स्प्राउट्स मल्टीविटामिन्स आणि एन्झाईम्सने समृद्ध असतात.


मूग डाळीचा चिला


आणखी एक स्वादिष्ट प्रोटीन-पॅक मूग डाळ चीला वजन कमी करण्यासाठी फायदेशीर आहे. मुगाची डाळ, भरपूर फायबर, पोट निरोगी ठेवून वजन कमी करण्यास मदत करते. त्यात प्रथिने आणि कॅलरीज जास्त असतात. यामुळे लवकर भूक लागत नाही. यामध्ये व्हिटॅमिन बी 6 सारख्या जीवनसत्त्वे आणि मॅग्नेशियम आणि पोटॅशियम सारखी आवश्यक खनिजे समृद्ध असतात.


व्हेजिटेबल उपमा


व्हेजिटेबल उपमा हा वजन कमी करण्यासाठी उत्तम पर्याय आहे. कारण त्यात कॅलरीज कमी असतात. त्यात रवा आणि अनेक फायबर समृद्ध भाज्या असतात त्यामुळे वजन कमी करण्यासाठी हा उपमा जास्त चांगला आहे. व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, बीटा-कॅरोटीन आणि इतर पोषक तत्वांनी समृद्ध, उपमा हा कार्बोहायड्रेट कमी करण्याचा आणखी एक मार्ग आहे.


ब्रेड आणि ऑम्लेट


ब्रेड आणि ऑम्लेट हे कॉम्बिनेशन जवळपास सगळ्यांनाच आवडतं. सकाळी नाश्त्याल अनेकजण ऑम्लेट ब्रेड खातात. याचं कारण म्हणजे हा चवीला अप्रतिम तर आहेच पण बनवायलायही अतिशय सोपा आहे. यामध्ये तुम्ही पांढऱ्या ब्रेडऐवजी ब्राऊन ब्रेड वापरू शकता. अंडी हा प्रथिनांचा उच्च स्रोत असल्याने, तुमची भूक कमी करण्यासाठी ब्रेड हा एक उत्तम पर्याय आहे.


क्विनोआ पुलाव


तुम्‍ही वजन कमी करण्‍याचा प्रयत्‍न करत असल्‍यास क्विनोआ पुलाव हा तुमच्‍यासाठी उत्तम पर्याय आहे. क्विनोआ पुलाव ग्लूटेन-फ्री आहे. यामध्ये कमी ग्लायसेमिक इंडेक्स आहे. अनेक पौष्टिक मूल्यामुळे हे सुपरफूड मानले जाते. क्विनोआ पुलावमध्ये क्वेर्सेटिन आणि केम्पफेरॉल ही दोन संयुगे आहेत जी अँटिऑक्सिडंट गुणधर्मांनी समृद्ध आहेत. क्विनोआमध्ये तुमच्या फिटनेससाठी भरपूर फायबर, पोषक आणि आवश्यक अमीनो अॅसिड असतात.


महत्त्वाच्या बातम्या :


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. 


Pregnancy Tips : प्रेग्नंसीत 'या' गोष्टी खा, बाळाची बुद्धी तल्लख होईल : संशोधनातून स्पष्ट