नाशिक : आगामी कुंभमेळाची (Kumbh Mela) जबाबदारी पुन्हा एकदामंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan)  यांच्यावर  सोपवण्यात आलीय.आगामी कुंभमेळाच्या जिल्हास्तरीय समितीच्या अध्यक्षपदी गिरीश महाजन यांची नियुक्ती करण्यात आलीय. तर पालकमंत्री दादा भुसे यांना सहअध्यक्ष पदावर समाधान मानावं लागणार आहे. दरम्यान 2026 -27  मध्ये नाशिकमध्ये (Nashik News)  कुंभमेळा (Kumbh Mela)  भरणार आहे.


नाशिकच्या राजकीय आणि प्रशासकीय कामकाजात भाजपचा प्रभाव जाणवणार आहे. गिरीश महाजन यांच्यावर पुन्हा एकदा कुंभमेळाची जबाबदारी आहे. आगामी कुंभमेळाच्या जिल्हास्तरीय समितीच्या अध्यक्षपदी गिरीश महाजन यांची नियुक्ती करण्यात आली आहे.  छगन  भुजबळ यांना मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील शिखर समितीत स्थान दिले  जाणार आहे नाशिकच्या पालकमंत्री पदावरून भुसे आणि भुजबळ यांच्यात रस्सीखेच सुरू असतानाच महाजन यांच्यावर मोठी जबाबदारी दिल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे 


आगामी कुंभमेळाच्या पार्श्वभूमीवर शासनाने  चार समित्या गठीत केल्या आहेत. शिखर समितीचे अध्यक्षपद मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तर उपाध्यक्ष पद गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे, तर अजित पवार,छगन भुजबळ यांच्यासह इतर 8 मंत्र्यांचा शिखर समितीत समावेश करण्यात आला आहे. उच्चधिकार समितीचे अध्यक्षपद मुख्य सचिवांकडे जिल्हास्तरीय समितीच्या अध्यक्षपदी गिरीश महाजन यांची नियुक्ती करण्यात आली आहे.


जगभरातून लाखो भाविक आणि पर्यटक भाग घेतात


कुंभमेळा आरखाडा तयार करणे, कामाचे नियोजन, खर्चला मंजुरी, वेळेत काम पूर्ण करणे आदी काम चार समितीच्या माध्यमातून केली जाणार आहे. मागील कुंभमेळा काळात फडणवीस यांनी कुंभमेळा मंत्री म्हणून  तत्कालीन पालकमंत्री गिरीश महाजन यांची केली  नियुक्ती होती.  पालकमंत्रीकडे जिल्हा समितीची जबाबदारी देणे अपेक्षित असताना ग्रामविकास मंत्रीकडे अध्यक्ष पद आहे. दरवर्षी कुंभ मेळाव्यासाठी देशभरातून तसेच जगभरातून लाखो भाविक आणि पर्यटक भाग घेतात. 


अशा आहेत तारखा...


 आगामी सिहंस्थ कुंभमेळ्याच्या तारखा जाहीर करण्यात आल्या असून ऑक्टोबर 2026 रोजी या सिहंस्थ सोहळ्याला सुरुवात होणार आहे.   2026 मध्ये नाशिकमधील त्र्यंबकेश्वर येथे कुंभमेळा होणार आहे. त्र्यंबकेश्वरच्या कुंभमेळ्याची तारीख जाहीर झाली आहे. कुंभमेळा पर्व 31 आक्टोंबर 2026 मध्ये परवाने सुरू होणार आहे. शाही स्नानास ऑगस्ट व सप्टेंबर 2027 या दोन महिन्यात तीन शाहीस्नान आहेत. ध्वजारोहण शाही स्नानाच्या दहा महिने अगोदर होणार आहे.  सिंहस्थ ध्वजारोहण सुरवात 31 ऑक्टोबर 26 रोजी, प्रथम शाही स्नान आषाढ 2 ऑगस्ट 27, द्वितीय शाही स्नान 31 ऑगस्ट 27, तृतीय शाही स्नान 12 सप्टेंबर 27, सिंहस्थ समाप्ती 28 सप्टेंबर 28 अशी कार्यक्रम प्रक्रिया असणार आहे.