Vitamins For Health : कोरोना विषाणूचा धोका पुन्हा एकदा वाढू लागला आहे. तर दुसरीकडे पावसाळ्याचे दिवसही सुरु झाले आहेत. त्यामुळे आहाराची आणि शरीराची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. यासाठी तुमची प्रतिकारशक्तीसुद्धा मजबूत असणे आवश्यक आहे. आहारामध्ये जीवनसत्त्वे समृद्ध आहार घेतल्यास रोगप्रतिकारशक्तीसुद्धा चांगली राहते तसेच शरीर कोणत्याही विषाणूशी लढण्यास देखील सक्षम राहते. रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी कोणते जीवनसत्त्वे आवश्यक आहेत हे जाणून घ्या.
1. व्हिटॅमिन-सी : रोगप्रतिकार शक्ती मजबूत करण्यासाठी व्हिटॅमिन सी खूप महत्वाचे आहे. व्हिटॅमिन सीच्या कमतरतेमुळे तुम्हाला सर्दी, खोकला यासारख्या समस्या होऊ लागतात. जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे फुफ्फुसात जळजळ होते, ज्यामुळे श्वास घेणे कठीण होते. व्हिटॅमिन सी जळजळ कमी करते. यासाठी लिंबूवर्गीय फळे आणि भाज्या खाव्यात.
2. व्हिटॅमिन-डी : शरीरात व्हिटॅमिन डी आणि कॅल्शियमच्या कमतरतेमुळे हाडे कमकुवत होऊ लागतात. यासाठी तुम्ही कॅल्शियम आणि फॉस्फरस समृद्ध असलेल्या गोष्टींचे सेवन करत राहणे गरजेचे आहे. यासाठी तुम्ही व्हिटॅमिन डी समृध्द असलेले सप्लिमेंट्सही घ्यावेत. व्हिटॅमिन डीचे सेवन केल्याने श्वसनाचे संक्रमण कमी होते. व्हिटॅमिन डी शरीराला श्वसनमार्गाच्या संसर्गापासून किंवा श्वसनाच्या स्नायूंमध्ये ताण येण्यापासून संरक्षण करते.
3. व्हिटॅमिन बी-6 : रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी व्हिटॅमिन बी-6 खूप आवश्यक आहे. व्हिटॅमिन बी 6 मध्ये आढळणारी जैवरासायनिक प्रतिक्रिया रोग प्रतिकारशक्ती मजबूत करते. यासाठी व्हिटॅमिन बी 6 समृद्ध असलेल्या गोष्टींचा आहारात समावेश करावा.
4. झिंक : कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी शरीरात झिंकची कमतरता नसावी. झिंकच्या कमतरतेमुळे लिम्फोसाइट्सच्या संख्येवर परिणाम होतो. झिंक शरीरात लिम्फोसाइट्सची संख्या वाढवते आणि प्रतिकारशक्ती मजबूत करते. झिंक देखील टी-सेल्स सक्रिय होण्यास मदत करते. झिंक रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
महत्वाच्या बातम्या :