Weight Loss Tips : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री भाग्यश्री (Bhagyashree) सोशल मीडियावर नेहमी अॅक्टिव्ह असते. भाग्यश्री तिच्या डान्सचे व्हिडीओ तसेच वेगवेगळ्या लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर करते. भाग्यश्रीच्या फिटनेसची सोशल मीडियावर चर्चा सुरू असते. भाग्यश्रीचे पती हिमालय दस्सानी (Himalaya Dassani)सोबतचे फोटो व्हायरल होतात. काही दिवसांपूर्वी अभिनेत्री समीरा रेड्डीनं (Sameera Reddy) तिच्या वाढलेल्या वजनाबाबत सांगितलं. आता भाग्यश्रीनं देखील तिच्या चाहत्यांना वजन कमी करण्यासाठी काही टिप्स सांगितल्या आहेत.
भाग्यश्रीनं एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती सांगते की, 'आपल्या शरीरात 70 टक्के पाणी आहे. हे पाणी शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढते. पाण्याचे प्रमाण जास्त असणाऱ्या भाज्यांचा डाएटमध्ये समावेश करा. त्यामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण वाढतं आणि वजन कमी होते. '
भाग्यश्रीनं पोस्टमध्ये लिहिलं, 'वजन वाढत आहे? वॉटर व्हेजिटेबचा डाएटमध्ये समावेश करा. शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यासाठी भरपूर पाणी प्यायची आवश्यकता असते.' पालक, टोमॅटो, कोबी आणि काकडी यांचा डाएटमध्ये समावेश करण्याचा सल्ला भाग्यश्रीनं तिच्या चाहत्यांना दिला आहे. भाज्यांमुळे शरीरातील पाण्याचं प्रमाण वाढते. तसेच त्यामध्ये डायट्ररी फायबर असतं. ज्यामुळे पचन क्रिया चांगली होते आणि वजन कमी होते.
भाग्यश्री ही 52 वर्षाची आहे. मैने प्यार किया या चित्रपटामुळे भाग्यश्रीला विशेष लोकप्रियता मिळाली. या चित्रपटातील भाग्यश्रीच्या आणि सलमानच्या जोडीला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. भाग्यश्रीला सोशल मीडियावर 1 मिलियनपेक्षा जास्त लोक फॉलो करतात.
महत्वाच्या बातम्या
Lock Upp Contestants Full List : कंगनाच्या लॉकअपमध्ये 'या' स्पर्धकांचा सहभाग
House Full : चार सिनेमात टक्कर, सिनेमागृहांबाहेर झळकतोय हाऊसफुल्लचा बोर्ड
Firaq Gorakhpuri: जेव्हा मीना कुमारी यांना पाहताच फिराक गोरखपुरी यांनी मुशायरा सोडला, वाचा काय आहे किस्सा...
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha