Lock Upp Contestants Full List : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत (Kangana Ranaut) सध्या तिच्या आगामी 'लॉकअप' या शोमुळे (Lock Upp) चर्चेत आहे. कंगनाचा हा शो आजपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा शो MX Player आणि Alt Balajiवर प्रसारित होणार आहे. लॉकअपमध्ये कंगना 16 सेलिब्रिटींवर अत्याचार करताना दिसणार आहे. यात 72 दिवस स्पर्धकांना तुरुंगात राहावे लागणार आहे.





कंगनाच्या लॉकअपमध्ये सहभागी होणार 'हे' स्पर्धक
सारा खान
बिदाई फेम सारा खान कंगनाच्या लॉकअपमध्ये सहभागी होणार आहे. सारा सलमान खानच्या बिग बॉसमध्येदेखील दिसून आली होती. 


निशा रावल
छोट्या पडद्यावरील अभिनेत्री निशा रावलदेखील या शोमध्ये सहभागी होणार आहे. निशा रावलने करण मेहरावर घरगुती हिंसाचाराचा आरोप केला होता. त्यामुळे ती चर्चेत आली होती. 


मुनव्वर फारुकी
विनोदवीर मुनव्वर फारुकीदेखील कंगना रणौतच्या लॉकअपमध्ये दिसणार आहे.


करणवीर बोहरा
कुबूल है या चित्रपटातून लोकप्रिय झालेला करणवीर बोहराही या शोमध्ये दिसणार आहे. करणवीर सोशल मीडियावर खूप लोकप्रिय आहे, तो त्याच्या तीन मुलींचे फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करत असतो.


पूनम पांडे
मॉडेल आणि अभिनेत्री पूनम पांडे नेहमीच चर्चेत असते. आता ती कंगनाच्या लॉकमध्ये सहभागी होणार आहे. 


बबीता फोगाट
दंगल हा सिनेमा कुस्तीपटू बबिता फोगटवर बनला आहे. आता ती कंगनाच्या लॉकअपमध्ये तिची ताकद दाखवताना दिसणार आहे. 


साईशा शिंदे (स्वप्नील शिंदे)
फॅशन डिझायनर साईशादेखील कंगनाच्या लॉकमध्ये दिसणार आहे. 


पायल रोहतगी
सोशल मीडियावर तिच्या व्हिडिओंमुळे नेहमीच चर्चेत असणारी पायल आता कंगनाच्या लॉकअपमध्येदेखील दिसणार आहे. पायल बिग बॉस 8 मध्येदेखील सहभागी झाली होती. 


तहसीन पूनावाला
राजकीय विश्लेषक तहसीन पूनावालादेखील कंगनाच्या लॉकअपमध्ये सहभागी होणार आहेत. बिग बॉस 13 मध्ये त्याने वाईल्ड कार्ड एन्ट्री केली होती. 


संबंधित बातम्या


House Full : चार सिनेमात टक्कर, सिनेमागृहांबाहेर झळकतोय हाऊसफुल्लचा बोर्ड


Shruti Haasan Tests Positive : अभिनेत्री श्रुती हासनला कोरोनाची लागण


Abhidnya Bhave : अभिज्ञा भावेच्या पतीची कॅन्सरशी झुंज, हॉस्पिटलमधील फोटो व्हायरल


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha