Benefits Of Matki Dal : कडधान्यांमध्ये एक कडधान्याचं नाव आवर्जून घेतलं जातं ते म्हणजे मटकी. मटकी हे असं कडधान्य आहे जे लहानांपासून वृद्धांपर्यंत सगळ्यांनाच आवडते. मटकीला वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या नावांनी ओळखले जाते. काही लोक मटकीला मॉथ म्हणतात तर काही मट बीन म्हणतात. तसेच प्रत्येक ठिकाणी मटकीचे प्रकार वेगवेगळे बघायला मिळतात. काही जण मटकीची मिसळ करतात, तर काही मटकीची भाजी करतात. काहींना उकडलेली मटकी खायला आवडते तर काहींना सॅलडमधून. अशा वेगवेगळ्या पद्धतींनी तुम्ही मटकीचा वापर करू शकतात. कडधान्यातला महत्वाचा पदार्थ मानल्या जाणाऱ्या मटकीचे अनेक फायदे आहेत. ते कोणते हे जाणून घ्या.     


मटकीचे फायदे : 



  • रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी सर्व आवश्यक पोषक घटक या डाळीमध्ये आढळतात.  

  • मटकीमध्ये भरपूर प्रमाणात फायबर आणि झिंक आढळते. 

  • वजन कमी करण्यासाठीसुद्धा मटकीचा वापर केला जातो. 

  • मटकीमध्ये व्हिटॅमिन बी मोठ्या प्रमाणात आढळते. 

  • मटकीमुळे उच्च कोलेस्ट्रॉलची पातळी आणि रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत मिळते. 

  • मटकीमध्ये अॅन्टी एजिंग घटक देखील आढळतात, ज्यामुळे त्वचा चमकते.

  • त्याचबरोबर पोटाच्या अनेक समस्याही याच्या सेवनाने दूर राहतात.


मटकी बाजारातून आणल्यानंतर सर्वात आधी तिला स्वच्छ पाण्याने धुवा. तसेच शिजण्यापूर्वी 6 तास भिजत ठेवा. त्यानंतर तुम्ही त्यापासून मिसळ, भाजी, सॅलडबरोबर खाऊ शकता. 


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.    


महत्वाच्या बातम्या :