Sachin Ahir On Maharashtra Political Crisis: सध्या आपल्याला कोणी गुवाहाटीला बोलवत नाही. कारण त्यांना गरजच नाही. असं वक्तव्य शिवसेनेचे विधानपरिषदेतील नवनिर्वाचित आमदार सचिन अहिरांनी केल्याचं समोर आलं आहे. हे वक्तव्य करताना त्यांचा सूर हा मिश्किलतेचा होता. मात्र सध्या जो मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसोबत असणारी व्यक्ती उद्या त्यांच्या गटात असेलच का? याची खात्री कोणी देत नाही आहे. म्हणूनच सचिन अहिरांच्या या वक्तव्याला घेऊन तर्क-वितर्क् लढवले जातायेत. 


पुण्याच्या चाकणमध्ये रविवारी सायंकाळी शिवसेनेचा मेळावा पार पडला. तेंव्हा अहिरांनी फोन नॉट रिचेबल झाला तर काय होऊ शकत, हे सांगताना आपल्याला गुवाहाटीला कोण बोलवत नाही. असं मिश्किल वक्तव्य केलं. त्याचवेळी शिवसेनेचे माजी आमदार शरद सोनवणेेंनी आम्हाला गुवाहाटीला जाण्यासाठी विशेष विमानाची सोय नाही. असं म्हणत हा बंड का झाला, याची कारण अहिरांना सांगून दाखवली. तर माजी आढळराव शिवाजी आढळराव पाटलांनी सुद्धा सोनवणेेंच्या सुरात सूर मिसळला. यामुळं उद्धव ठाकरेंच्या गटात उरलेले नेते ही तीच खदखद बोलवून दाखवत असल्याचं समोर आलंय.


आमच्याबाबत अनेक गोष्टी घडत होत्या.  त्या बाबी मी उद्धव ठाकरेंच्या कानावर टाकल्या, त्यातून काही प्रश्न आपण सोडविल्या. हे कटकारस्थान चालत राहतं. परंतु आम्ही कधी कोणाला संपविण्याची भाषा करत नाही. पुणे जिल्ह्यासाठी काय लाभ मिळाला?, हा प्रश्न आपण स्वतःच्या मनाला विचारला, तर त्याचं उत्तर प्रत्येकाला माहित आहेच. त्यामुळं आपल्याला सत्तेची पर्वा नाही. मात्र आपल्याला संपविण्याची भाषा करत असेल तर त्याला रोखल्याशिवाय राहणार नाही, असंही सचिन आहिर म्हणाले.


आत्ता ही राज्यात भूकंप पडलाय, अशा परिस्थितीत ही पालकमंत्री अजित पवारांनी पुणे जिल्ह्यात 170 कोटींचा निधी दिला. पण तो फक्त राष्ट्रवादीच्या खासदार - आमदारांना दिला. म्हणूनच मी सांगत आलोय की, राज्यात महाविकासआघाडीत असताना ही सर्वाधिक त्रास पुणे जिल्ह्यातील शिवसैनिकांना झाला. याकडे आढळरावांनी लक्ष वेधलं.