Gargles Benefits : कोरोनापासून वाचण्यासाठी अनेक जण विविध उपाय करतात. अनेक लोक घरगुती उपायांचा वापर करतात. तर काही लोक कोरोनापासून बचाव करण्यासाठी वाफ घेत आहेत. डेकोक्शन पीत आहेत. तुम्हाला जर सर्दी आणि घशाचा संसर्ग झाल्यास गुळण्या (Gargles) करणे आवश्यक आहे. यामुळे घशाला आराम मिळतो आणि घशाची सूजही कमी होते. गुळण्या करण्याची योग्य पद्धत कोणती आणि दिवसातून किती वेळा गुळण्या कराव्यात हे जाणून घ्या.


गुळण्या करण्याचे फायदे :


गुळण्या केल्याने घशातील घाण साफ होते, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. घसा खराब असेल किंवा कोणत्याही प्रकारची सूज असेल तर अशावेळी गुळण्या कराव्यात. काही लोक गरम पाण्यात मीठ टाकून टाकून गुळण्या करतात. 


किती वेळा आणि केव्हा गुळण्या कराव्या?


तुम्हाला तुमच्या घशात काही समस्या असल्यास, डॉक्टर तुम्हाला दिवसातून अनेक वेळा गुळण्या करण्यास सांगू शकतात. पण सामान्य व्यक्तीने फक्त सकाळी आणि संध्याकाळी किंवा दिवसातून तीन वेळा गुळण्या केल्या पाहिजेत. तुम्ही न्याहारी, दुपारचे जेवण आणि रात्रीच्या जेवणानंतर गुळण्या करू शकता. पण यावेळी पाणी जास्त गरम होणार नाही याची काळजी घ्या. 


कोणत्या प्रकारचे गुळण्या करणे चांगले?


1- बेटाडाइनने गुळण्या करा


जर तुमचा घसा खराब असेल, घशात कोणत्याही प्रकारची सूज असेल किंवा घशात दुखत असेल तर तुम्ही बीटाडाइन पाण्यात मिसळून गुळण्या करा. Betadine एक बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ आहे जे संक्रमण बरे करते. 


2- मिठाच्या पाण्याने गुळण्या करा


जर तुम्हाला कोणतीही अडचण नसेल तर तुम्ही 1 चिमूट मीठ टाकून कोमट पाण्याने गुळण्या करू शकता. दिवसातून 3 पेक्षा जास्त वेळा गुळण्या करू नये. 


3- हळदीच्या पाण्याने गुळण्या करा


हळदीमध्ये अँटी-सेप्टिक आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म आढळतात. यामुळे अनेक प्रकारच्या समस्या दूर होतात. योग्य प्रमाणात हळद घालून तुम्ही गार्गल्स करू शकता. पण त्याचा जास्त वापर केल्यास नुकसानही होऊ शकते.


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.


महत्वाच्या बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha