Weight Loss Food : जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल, तर तुम्हाला तुमच्या आहाराकडे सर्वाधिक लक्ष द्यावे लागेल. अशा गोष्टींचा आहारात समावेश करावा लागेल, ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होईल. वजन कमी करण्यासाठी बार्ली अर्थात जव (Barley) हे सर्वोत्तम अन्न आहे. आहारात गव्हाच्या चपातीऐवजी जवाच्या पिठापासून बनवलेल्या चपातीचा किंवा भाकरीचा समावेश करा. त्यात भरपूर पोषक तत्वे आढळतात. प्रथिने, फायबर, ब जीवनसत्त्वांसह जवामध्ये लोह, जस्त यांसारखी खनिज घटक देखील आढळतात. यामध्ये खूप कमी कॅलरीज असतात आणि फायबरचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे वजन कमी करणे सोपे होते. चला तर, जाणून घेऊया याचे फायदे..
जवाचा आहारात समावेश करण्याचे फायदे (Barley Benefits) :
वजन कमी करण्यात फायदेशीर (Help in Weight loss) : जवापासून बनवलेली भाकरी किंवा चपाती खाल्ल्याने वजन कमी होण्यास मदत होते. त्यात खूप कमी कॅलरीज असतात आणि त्यात भरपूर फायबर आढळते. ज्यामुळे खाल्ल्यानंतर बराच वेळ भूक लागत नाही. यामुळे तुमचे पोट बराच काळ भरलेले राहते. म्हणून वजन कमी करण्यासाठी आहारात जवाचा समावेश करावा.
पचनक्रिया सुधारते (Improves Digestion) : जवयुक्त पदार्थ खाल्ल्याने पचनक्रिया चांगली राहते. त्यामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते. याच्या सेवनाने पोट आणि पचनसंस्था दोन्ही चांगल्या राहतात. यामुळे बद्धकोष्ठतेची समस्या कमी होते.
कोलेस्ट्रॉल नियंत्रित होते (Help Lower Cholesterol) : जर तुम्हाला कोलेस्ट्रॉलची समस्या असेल, तर आहारात जवाचा समावेश जरूर करा. यामुळे कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते. जव बीटा-ग्लुकन्स पित्त कमी करून खराब कोलेस्ट्रॉल नियंत्रित करते.
मधुमेहावर नियंत्रण मिळवता येते (Diabetes Control) : आहारात जवाचा समावेश केल्याने रक्तातील साखरेची पातळीही नियंत्रित राहते. यामुळे इंसुलिन रिलीज सुधारते आणि टाईप 2 मधुमेहाचा धोका कमी होतो.
हृदय निरोगी राहते (Reduce Heart Disease) : हृदयविकाराने त्रस्त असलेल्यांनीही आहारात जवाचा समावेश करावा. जवाच्या सेवनाने हृदयाचे आरोग्य चांगले राहते. जे लोक नियमितपणे जवाचे सेवन करतात, त्यांना हृदयविकाराचा धोका कमी असतो.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
महत्वाच्या बातम्या :
- Kitchen Tips : घरच्या घरी बनवा चविष्ट व्हेज गार्लिक सूप, लहान मुलांच्या आरोग्यासाठीही फायदेशीर!
- Beauty Tips : लिंबाच्या सालीचा असा करा वापर, फाटलेल्या ओठांपासून कोंड्यापर्यंतची समस्या होईल दूर
- Coffee Benefits: दररोज किती कॉफी पिणे योग्य? पाहा कॉफीचे फायदे
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha