मुंबई : तहान लागल्यावर अनेक जण पाणी किंवा सरबतं पिण्याऐवजी शीतपेयं पिणं पसंत करतात. मात्र वारंवार कोल्ड्रिंक पिण्याची ही सवय आपल्याला महागात पडू शकते. कोल्ड्रिंक पिण्याच्या दुष्परिणामांकडे लक्ष देणं महत्त्वाचं आहे.
कोल्ड्रिंकमध्ये साखरेचं प्रमाण जास्त असल्याने रक्तातील ग्लुकोजचं प्रमाण वाढतं. त्यामुळे वजन वाढून लठ्ठपणा येण्याची शक्यता वाढते. लहान मुलांमधल्या लठ्ठपणाचं मुख्य कारण कोल्ड्रिंक्सही असू शकतं.
डाएट सोडाही शरीरासाठी घातक ठरु शकतो, त्यामुळे साखर खाण्याची इच्छा वाढते. गोड पदार्थ जास्त प्रमाणात खाल्ले जातात आणि त्याचे शरीरावर दुष्परिणाम होतात.
कोल्ड्रिंक्स नियमित प्यायल्याने पचनशक्ती बिघडते. अपचन, अॅसिडीटी, गॅसेस, मूळव्याध, जुलाब अशा प्रकारचे आजार कोल्ड्रिंक्समुळे होण्याची शक्यता असते. आतड्यांचे आरोग्य बिघडून त्याचे आजार होण्याची शक्यता कोल्ड ड्रिंक्समुळे वाढते.
सॉफ्ट ड्रिंक्समध्ये असलेल्या घटकांमुळे कॅन्सरसारखे आजार, मेंदूचे विकार, डोकेदुखी, थकवा, त्वचाविकार, थायरॉईड, हार्मोन्सचे विकार, वंध्यत्व येण्याची शक्यता असते.
कोल्ड्रिंक्समध्ये असलेल्या कॅफेनमुळे निद्रानाश होतो, रक्तदाब वाढतो. शीतपेयांच्या नियमित सेवनाने शरीरातून पाण्याचं प्रमाण कमी होऊन शरीर कोरडं होतं. यासोबत किडनी, लिव्हर, हाडं, दाताचे विकार, ह्रदयविकार होण्याची शक्यता वाढते.
डोकेदुखी, अपचन ते लठ्ठपणा, कोल्ड्रिंक्स पिण्याचे दुष्परिणाम
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
20 Nov 2018 03:07 PM (IST)
कोल्ड्रिंक्स नियमित प्यायल्याने पचनशक्ती बिघडते. अपचन, अॅसिडीटी, गॅसेस, मूळव्याध, जुलाब अशा प्रकारचे आजार कोल्ड्रिंक्समुळे होण्याची शक्यता असते.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -