Avocados benefits : एवोकॅडो (Avocado) हे एक असं फळ आहे, ज्यामध्ये फॅटी अॅसिड खूप प्रमाणात आढळतात. पण यामध्ये कॉलेस्ट्रॉलची पातळी कमी असते. अधिकतर लोकांचं म्हणणं आहे की, एवोकॅडोमध्ये कॅलरीची मात्रा अधिक प्रमाणात आढळते. त्यामुळे एवोकॅडो हे वजन वाढविण्यासाठी आणि वजन कमी करण्यासाठी देखील उपयुकत असं फळ आहे. पण एवोकॅडो हे हृदय आणि रक्तवाहिन्यांसंबंधी आरोग्याशीदेखील संबंधित आहे हे तुम्हाला माहित आहे का? जाणून घ्या एवोकॅडोचे फायदे.   


नुकत्याच झालेल्या एका अभ्यासानुसार आठवड्यातून दोन वेळा एवोकॅडो खाल्ल्याने हृदय आणि रक्तवाहिन्यासंबंधी रोगाचा धोका कमी होतो.  हा अभ्यास जर्नल ऑ द अमेरिकन हार्ट असोसिएशनमध्ये प्रकाशित करण्यात आला आहे. यानुसार, मोनोअनसॅच्युरेटेड फॅट आणि हृदय आणि रक्तवाहिन्यांसंबंधी आरोग्याशी संबंधित इतर अनुकूल घटक असतात. संशोधकांचा असा विश्वास आहे की, एवोकॅडोचे जास्त सेवन केल्याने हृदय आणि रक्तवाहिन्यांसंबंधीच्या घटना, जसे की कोरोनरी हृदयरोग आणि स्ट्रोक यांचा धोका कमी होऊ शकतो.   


एवोकॅडोचे फायदे : 



  • हृदय आणि रक्तवाहिन्यांसंबंधी जोखीम घटक आणि एकूण आहाराच्या विस्तृत श्रेणीचा विचार केल्यास, प्रत्येक आठवड्यात किमान दोन एवोकॅडो खाल्ल्यास रक्तवाहिन्यांसंबंधी रोगाचा धोका 16 टक्के कमी होतो. 

  • एवोकॅडो हृदय निरोगी ठेवण्यासही खूप उपयोगी आहे. एवोकॅडोमध्ये बीटा-सिटोस्टीरॉल आढळतं जे कॉलेस्ट्रॉलचं प्रमाण कमी करून हृदयाला रोगांपासून दूर ठेवतं. एका रिसर्चनुसार, नियमितपणे एवोकॅडो खाल्ल्याने एचडीएल कॉलेस्ट्रॉलचे अँटीएथेरोजेनिक गुण वाढतात. जे हृदयाला एथेरोस्क्लेरोसिसपासून दूर ठेवतात. याच्या सेवनाने हॉर्ट अटॅक आणि स्ट्रोकचा धोकाही कमी होतो. 

  • एवोकॅडो मध्ये वाढलेले कोलेस्ट्रॉल आणि ब्लडप्रेशर कमी करणारे गुणधर्म असतात. जे हृदयाच्या आरोग्यासाठी देखील उपयुक्त ठरतात. एवोकॅडो मध्ये अनेक विटामिन आणि खनिजं असतात. जे त्वचा आणि केसांचे आरोग्य सुधारतात.

  • एवोकॅडोमध्ये अशी तत्त्व आहेत जी शुगर लेव्हल कंट्रोलमध्ये ठेवतात. त्यामुळे याचं सेवन केल्यास मधुमेह असणाऱ्या व्यक्तींना फारच लाभ होतो आणि शुगरही कंट्रोलमध्ये राहते.

  • आश्चर्यकारक बाब म्हणजे एवोकॅडो रक्त शुद्धीकरण करतं. ज्यामुळे आपली अनेक रोगांपासून स्वाभाविकपणे मुक्तता होते.


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.


महत्वाच्या बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha