मुंबई: जीवघेण्या कॅन्सरवर (कर्करोग) काहीशा प्रमाणात उपाय शोधण्यात आला आहे. संशोधकांच्या मते, एक अॅण्टीबॉडी (घातक अणुजीव नष्ट करणारे) कॅन्सरशी लढा देणारी रोगप्रतिकार प्रणाली वाढवतं तसंच कॅन्सरची वाढही रोखतं. हे अॅण्टीबॉडी मूळ स्वरुपात ऑटोइम्युनची स्थिती मल्टीपल स्केलेरोसिसने विकसित करण्यात आलं आहे. हे संशोधन 'जर्नल सायन्स इम्युनोलॉजी'मध्ये प्रकाशित करण्यात आलं आहे.

संशोधकांच्या मते, अॅण्टीबॉडीमुळे मेलेनोमा कॅन्सर, ब्रेन कॅन्सर आणि कोलोरेक्टल कार्सिनोमा हे कमी होतं. अॅण्टीबॉडी या खासकरुन टी-पेशींना लक्ष्य करतं. ज्यामुळे रोगप्रतिकार प्रणाली कर्करोगाच्या पेशी नष्ट करण्यासाठी मदत करते.

ब्रिघमचे न्यूरोलॉजिस्ट हॉवर्ड वेनियर आणि बोस्टनच्या महिला रुग्णालयातील संशोधकांच्या मते, अॅण्टीबॉडीचा वापर करुन ट्रेग्सला लक्ष्य करता येतं. या संशोधकांनी अॅण्टी एलएपी अॅण्टीबॉडी विकसित केलं आहे. जे मल्टीपल स्केलेरोसिसच्या विकासाची चाचणी करण्यासाठी तयार करण्यात आलं होतं. पण हे अॅण्टीबॉडी कॅन्सरच्या शोधासाठीही उपयुक्त असल्याचं आढळून आलं.

या संशोधनात संशोधकांनी एलएपी अॅण्टीबॉडीजच्या ट्रेगच्या आवश्यक क्रिया रोखण्यासाठी आणि कॅन्सरशी लढण्यासाठी रोगप्रतिकार प्रणालीची क्षमता वाढवण्याच्या भूमिकेबाबत संशोधन केलं आहे.

सूचना : या संशोधनात  जो दावा करण्याता आला त्याबाबत एबीपी माझानं पडताळणी केलेली नाही. तुम्ही कोणत्याही रोगावर इलाज करण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला जरुर घ्या.