AI-Based Death Predictor : 'जो जन्माला येतो, त्याचा मृत्यू अटळ आहे', असं म्हटलं जातं. कोणत्या व्यक्तीचा मृत्यू कधी, कुठे आणि कसा होईल काही सांगता येत नाही. या प्रश्नांची उत्तरं कुणाकडेच नाही. पण, तुम्हाला या प्रश्नांची उत्तरं मिळाली तर. लवकर मनुष्याचा मृत्यू कधी आणि केव्हा होणार याबाबतही माहिती मिळू शकेल. सध्या जग खूप बदललं आहे. बदलत्या आधुनिक जगात नवीनवीन शोध लागले आहेत. याच बदलत्या काळात मानवाला लवकरच मृत्यूची तारीख समजेल. आता लवकरच आर्टिफिशियल इंटेलिजन्स (Artificial Intelligence) म्हणजेच AI तंत्रज्ञानाद्वारे मानवाच्या मृत्यूची वेळ आणि तारीख समजू शकणार आहे.


आता AI सांगणार तुमच्या मृत्यूची तारीख आणि वेळ


भविष्यातच तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे अनेक गोष्टी शक्य होतील. जगभरातील वैज्ञानिकांकडून अनेक विषयांवर संशोधन सुरु आहे. आता शास्त्रज्ञांनी आणखी एक शोध लावत विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या जगात माठं पाऊल टाकलं आहे. काही शास्त्रज्ञांच्या टीमने माणसाच्या मृत्यूची तारीख आणि वेळ जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. डेन्मार्कमधील विद्यापिठातील शास्त्रज्ञांनी मृत्यूची भविष्यवाणी तयार करण्याचा प्रयत्न केला आहे.


माणसांची' एक्सपायरी डेट' कळणार


डेन्मार्कमधील 'टेक्निकल युनिव्हर्सिटी ऑफ डेन्मार्क' (DTU) ने आर्टिफिशियल इंटेलिजन्स (Artificial Intelligence) म्हणजेच AI वर आधारित मृत्यूची भविष्यवाणी तयार केली आहे. या शास्त्रज्ञांकडून असा दावा करण्यात आला आहे की, हे AI तंत्रज्ञान मृत्यूचा अंदाजाबाबत म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूची वेळ अगदी अचूकपणे सांगू शकतो. या AI तंत्रज्ञानाद्वारे माणूस किती वर्षे जगणार आहे हे समजू शकते, असा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे.


मृत्यूचा अंदाज कसा लागणार?


ChatGPT च्या आधारे तयार करण्यात आलेल्या या नवीन मॉडेलला AI Life2vec प्रणाली असं नाव देण्यात आलं आहे. यालाच 'AI डेथ प्रीडिक्टर' सिस्टम (AI Death Predictor) असंही म्हणता येईल. ही प्रणाली आरोग्य, शिक्षण, व्यवसाय आणि उत्पन्न यांसारखी वैयक्तिक माहिती घेते आणि त्यानंतर त्या आधारे एखाद्या व्यक्तीच्या आयुष्याचा अंदाज लावते.


डॅनिश लोकसंख्येचा डेटा वापरून या प्रणालीची चाचणी केली असता, यामध्ये मृत्यूची अचूक वेळ समोर आली. चाचणीसाठी, 2008 ते 2020 पर्यंत 60 लाख लोकांशी संबंधित आरोग्यविषयक माहितीचं विश्लेषण करण्यात आलं. याद्वारे, या AI तंत्रज्ञान प्रणालीने संबंधित व्यक्तीच्या मृत्यूची सुमारे 78 टक्के अचूक डेटा माहिती दर्शविली.


डेथ प्रीडिक्टर सिस्टमवर अभ्यास केला


AI Life2vec प्रणालीवर विद्यापीठात 'युजिंग द सिक्वेन्स ऑफ लाईफ इव्हेंट्स टू प्रेडिक्ट मानवी जीवन' नावाचा अभ्यास करण्यात आला आहे. न्यूयॉर्क टाइम्सशी बोलताना या अभ्यासाचे प्रमुख लेखक सून लेहमन यांनी सांगितलं की, 'आम्ही प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात घडणाऱ्या घटनांचा क्रम तयार केला आहे. यानंतर, या क्रमाचे विश्लेषण करण्यासाठी ChatGPT प्रमाणे AI तंत्रज्ञान वापरण्यात आलं आहे 'काही स्तरावर मानवी जीवनही भाषेसारखेच असते, ही वस्तुस्थिती आम्ही वापरली. ज्याप्रमाणे शब्द वाक्यात एकमेकांच्या मागे लागतात, त्याचप्रमाणे मानवी जीवनातील घटना एकमेकांच्या मागे लागतात.'