Acidity Problem : आपल्यापैकी जवळपास प्रत्येकाला कधी ना कधी ॲसिडिटीची (Acidity) समस्या भेडसावत असते. पचनसंस्थेशी संबंधित ही एक सामान्य समस्या मानली जाते. यावर तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, जास्त तेलकट आणि मसालेदार अन्न खाल्ल्याने पोटातील पित्त वाढते, याच कारणामुळे ॲसिडिटीची समस्या उद्भवते. त्यामुळे आंबट ढेकर येणे, पोटात जळजळ यांसारख्या समस्याही उद्भवू शकतात. पण काही वेळा खाण्यापिण्याच्या चुकीच्या वेळेमुळेही ही समस्या उद्भवू शकते.
याच संदर्भात पारस हेल्थ केअर येथील गॅस्ट्रोलॉजीचे सल्लागार डॉ. राजन धिंग्रा सांगतात की, आजकाल बिघडलेल्या जीवनशैलीमुळे ॲसिडिटी आणि ब्लोटिंगची समस्याही उद्भवत आहे. जर आपण वेळेवर अन्नाचं सेवन केलं नाही तर त्यामुळे गॅसची समस्या देखील होते. विशेषत: ज्यांना जेवणाची सवय नाही अशा लोकांसाठी ही समस्या अधिक गंभीर आहे. अशा लोकांना जेवणानंतर पोटात जडपणा जाणवतो. यामुळे अॅसिडीटीची समस्या उद्भवते.
दुपारच्या जेवणानंतर ऍसिडिटी
डॉ. राजन धिंग्रा सांगतात की, लोकांना अनेकदा जेवणानंतर ॲसिडिटीचा त्रास होतो. जर तुम्हालाही दुपारच्या जेवणानंतर ॲसिडिटीच्या समस्येला सामोरे जावे लागत असेल, तर या समस्यांमागील कारण समजून घेणे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. दुपारच्या जेवणाच्या वेळी झालेल्या काही चुकांमुळे बहुतेक गॅसच्या समस्या उद्भवतात. अनेक वेळा तुम्ही अन्न मोठ्या तुकड्यांमध्ये खातात, त्यामुळे ते पोटात सहज पचत नाही आणि ॲसिडचे उत्पादन वाढते, त्यामुळे ॲसिडिटी होऊ शकते.
'हे' देखील कारण आहे
दुपारच्या जेवणादरम्यान पाणी प्यायल्याने पोटातील पाचक एन्झाईम्सला हानी पोहोचते. परिणामी, तुम्हाला ॲसिड रिफ्लक्सची समस्या येऊ लागते. भाजीपाला फायबरचा एक चांगला स्रोत आहे जो पचनासाठी खूप महत्वाचा आहे आणि दुपारच्या जेवणात भाज्या कमी घेतल्यास देखील ॲसिडिटीचा त्रास होऊ शकतो. याशिवाय दुपारच्या जेवणानंतर लगेच झोपल्याने पचनसंस्थेवरही परिणाम होतो ज्यामुळे ॲसिडिटी वाढते. त्यामुळे आम्लपित्त टाळण्यासाठी या सामान्य लक्षात ठेवण्यासारख्या गोष्टी आहेत. जर तुम्ही या समस्या वेळीच बदलल्या नाहीत तर तुम्ही वेळी अवेळी अॅसिडीटीची समस्या होऊ शकते.
(टिप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. त्यामुळे शरीराच्या कोणत्याही समस्येवर कोणताही उपाय करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं आहे.)
महत्त्वाच्या बातम्या :