प्राग: झेकोस्लावाकियामधील नागरिकांमध्ये बिअरच्या अतिरिक्त सेवनामुळे आरोग्याच्या समस्या उद्भवल्या आहेत. त्यामुळे त्यांचे बिअरचे सेवन ही धोक्याची घंटा असल्याचे मत झेकोस्लावाकियामधील एका संशोधनकर्त्यांच्या चमूने म्हणले आहे.
चेक रिपब्लिकच्या मसारिक विद्यापीठातील क्रीडा अध्ययन विभागाने याबाबतचा आहवाल तयार केला असून, यातील अकडेवारीची तुलना युरोपमधील 42 देशांमध्ये पसरलेल्या महारोगाशी केली आहेत
या संशोधनाचे प्रमुख लेखक पावेल ग्रासग्रबर यांनी दिलेल्या माहितीनुसार, डाएटमध्ये बिअरचे सेवन प्रत्येक चेकमधील नागरिकाला हानीकारक आहे. तसेच हे इतर खाद्यपदार्थांपेक्षा जास्त अपायकारक ठरु शकते.
या संशोधनामध्ये अल्कोहोलचे सेवन, आमली पदार्थांचे सेवन आणि धुम्रपान यांचीही तुलना करुन निष्कर्ष नोंदवले आहेत. आहवालाने दिलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या वर्षभरात 104 जणांचा आमली पदार्थांमुळे मृत्यू झाला. यामध्ये 44 जणांचा आमली पदार्थांच्या अतिरिक्त सेवनामुळे, तर 60 जणाचा मृत्यू हा औषधांच्या दुरुपयोगाने झाला.
तसेच अल्कोहोलचे सेवन हे आमलीपदार्थांच्या सेवनापेक्षा सर्वाधिक नुकसानकारक असल्याचं यामध्ये म्हणलं आहे. कारण अल्कोहोल असलेल्या द्रव्याच्या सेवनामुळे 133 जणांच्या मृत्यू झाल्याचं म्हटलं आहे. तसेच 682 जणांच्या अपघाती मृत्यू आणि आत्महत्येसाठीही अल्कोहोल कारणीभूत असल्याचे या आहवालात नमुद करण्यात आलं आहे.
गेल्या वर्षभरात 57 जणांचा अल्कोहोलच्या अतिरिक्त सेवनामुळे मृत्यू झाला असून, 342 जणांना अल्कोहोलमधून विषबाधा झाल्याचंही यातून सांगण्यात आलं आहे.
तसेच यामध्ये ड्रंक अॅण्ड ड्राईव्हचीही माहिती देण्यात आली असून, 2002 मध्ये ड्रंक अॅन्ड ड्राईव्हमुळे 4959 जणांचा अपघात झाला. यात अनेकजण जखमी झाले. तर गेल्या वर्षभरात ही संख्या 7,384 पोहोचल्याचं सांगण्यात आलंय. 2002 मध्ये जे प्रमाण 2.7 टक्के होते, तेच प्रमाण 2015मध्ये 3.5 टक्के झाल्याचे या अहवालात म्हणले आहे.