मुंबई: सातबाराच्या एका कागदासाठी तलाठ्याच्या कार्यालयाचा उंबरा झिजवण्यातून आता सुटका होणार आहे. कारण मुख्यमंत्र्यांनी दत्तक घेतलेल्या फेटरी गावात चक्क सातबाऱ्यासाठी व्हेंडिंग मशीन बसवण्यात येणार आहे.


व्हेंडिंग मशिनमध्ये 20 रुपये टाकले आणि तुमच्या शेतजमिनीचा तपशील भरलात की थेट सातबारा हातात मिळणार आहे.

सध्या पायलट प्रोजेक्ट म्हणून नागपूर जिल्ह्यातील फेटरी गावात हे मशीन बसवलं जाईल.

सात-बाराच्या उताऱ्यासाठी शेतकऱ्यांना ग्रामपंचायत आणि तलाठ्यांचे उंबरठे झिजवावे लागतात. मात्र आता अशाप्रकारच्या व्हेंडिंग मशिनमुळे सुटका होणार आहे.