Aashadh Deep Amavasya 2023 : आषाढी अमावस्या किंवा दीप अमावस्या (Deep Amavasya 2023)  ही आषाढ महिन्यातील अखेरीस येणाऱ्या अमावस्येला म्हटलं जातं. आषाढ अमावस्या ही चातुर्मासातील पहिली अमावस्या असं मानलं जातं. श्रावण महिन्याला सुरुवात होण्याच्या आदल्या दिवशी अमावस्या येते. या अमावास्येला दीपपूजनाला अधिक महत्व प्राप्त झाले असून, ते भाग्यकारक मानले गेले आहे. या दिवशी स्नान, दान आणि पूजाविधीचे वेगळे महत्त्व आहे. 


यावर्षी आषाढ अमावस्या 17 जुलै रोजी म्हणजेच आज आहे. याला दीप अमावस्या किंवा दिव्यांची पहाट म्हणतात. या दिवशी घरात दिवे लावले जातात आणि रांगोळी काढून पूजा केली जाते. या पूजेत पिठाचा दिवा लावला जातो.


दीप अमावस्येचं महत्त्व


या अमावास्येला (Amavasya) पितरांसाठी यज्ञ आणि दान केल्याने पुण्य मिळते असे म्हटले जाते. आषाढ अमावस्येला दीपपूजनाचे महत्त्व आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक अमावस्येला वेगवेगळी वैशिष्ट्ये आहेत. ही पूजा म्हणजे येत्या श्रावणाच्या (Shravan) स्वागताची तयारी आहे. या दिवशी पिठाचा किंवा बाजरीचा दिवा दक्षिण दिशेला ठेवावा. हा दिवा पूर्वजांच्या पूजनाचे ठेवल्यास घरात सुख शांती लाभते


दीप अमावस्येचा शुभ मुहूर्त 


पंचांगानुसार अमावस्या तिथी 16 जुलै रोजी रात्री 10 वाजता सुरू झाली. पण सूर्योदयामुळे ती (17 जुलै) म्हणजेच आज साजरा केली जाणार आहे. आज मध्यरात्री 12 वाजता अमावस्या तिथी समाप्त होईल. आषाढ अमावस्या सोमवारी आल्यामुळे याला सोमवती अमावस्या असे देखील म्हटले जाणार आहे. म्हणूनच ही अमावस्या विशेष आहे.


'अशी' साजरी करा दीप अमावस्या 


दीप अमावस्येच्या दिवशी घरात ठेवलेले दिवे स्वच्छ केले जातात. यानंतर, टेबलावर स्वच्छ कापड पसरवा आणि दिवा ठेवा. तो तिळाच्या तेलाने किंवा तूपाने जाळले जातात. या दिव्यांना फुले आणि नैवेद्य दाखवून पूजा केली जाते.


'या' मंत्राचा जप करा 


पूजा झाल्यानंतर 'दीप सूर्याग्निरूपस्त्वं तेजस: तेज उत्तमम । गृहाणं मत्कृतां पूजा सर्व कामप्रदो भव:॥', या मंत्राचा जप करा. या मंत्राचा अर्थ असं होतो की,  हे दीपदेवा, तू सूर्यरूप व अग्निरूप आहेस, तेजामध्ये उत्तम तेज आहेस. मा‍झ्या पूजेचा स्वीकार कर आणि मा‍झ्या सर्व इच्छा पूर्ण कर, असा होतो. 


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. 


महत्वाच्या बातम्या :


Important Days in July 2023 : 'महाराष्ट्र कृषी दिन', 'गुरुपौर्णिमा', 'मोहरम'सह एप्रिल महिन्यातील 'हे' आहेत महत्त्वाचे दिवस; वाचा संपूर्ण यादी