8th July 2022 Important Events : जुलै महिना सुरु झाला आहे. या दरम्यान, प्रत्येक दिवसाचं वेगळं असं महत्व आहे. या दिनविशेषच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला इतिहासातील महत्त्वाच्या घटनांचा आढावा देणार आहोत. जुलै महिन्यात सामाजिक, आर्थिक आणि दैनंदिन जीवनात त्या दिवसाचं महत्त्व नेमकं काय आहे हे या माध्यमातून जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात 8 जुलैचे दिनविशेष.


8 जुलै : अभिनेत्री नीतू सिंग यांचा जन्मदिन. 


नीतू सिंग या एक भारतीय सिने-अभिनेत्री आहेत. 1966 सालच्या 'दस लाख' ह्या चित्रपटामध्ये बाल-कलाकार म्हणून त्यांच्या चित्रपट कारकिर्दीला सुरुवात झाली. नीतू सिंग यांनी आजवर 60 पेक्षा अधिक बॉलिवूड चित्रपटांमध्ये नायिकेच्या भूमिका केल्या आहेत. ऋषी कपूर यांच्यासोबत त्यांची जोडी प्रसिद्ध होती. 1980 साली त्यांनी प्रसिद्ध अभिनेते ऋषी कपूर यांच्याशी लग्न केले.  


1972 : माजी भारतीय अष्टपैलू क्रिकेटपटू आणि कर्णधार सौरव गांगुली यांचा जन्मदिन.


सन 1972 साली प्रख्यात माजी भारतीय अष्टपैलू क्रिकेटपटू आणि कर्णधार तसेच, भारतीय क्रिकेट प्रशासक, समालोचक आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे विद्यमान अध्यक्ष सौरव गांगुली यांचा जन्मदिन. भारताकडून कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेट खेळणारे क्रिकेट खेळाडू आहे. गांगुली यांच्या नावे 15 कसोटी शतके आणि 22 एकदिवसीय सामन्यांतली शतके आहेत. एकदिवसीय सामन्यांत 10,000 धावा काढणारे गांगुली जगातील सातवे तर भारतातील दुसरे फलंदाज आहेत.


1916 : साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त महाराष्ट्रीयन मराठी लेखक, इतिहासकार आणि कादंबरीकार गो.नी. दांडेकर यांचा जन्मदिन.


मराठी कादंबरीकार आणि कथा, चरित्रे, लघुनिबंध इ. अनेक साहित्यप्रकार हाताळणारे सव्यसाची लेखक. दांडेकरांनी लिहिलेल्या एकूण पुस्तकांची संख्या शंभरांहून अधिक भरेल. त्यात धर्म, संस्कृती, पुराण, इतिहास इ. विविध विषयांवरील आणि कथा, कादंबरी, चरित्र इ. साहित्यप्रकारांतील लेखन आढळते. 


1997 : बिंजिंग येथे झालेल्या आशियाई महिला वेटलिफ्टिंग स्पर्धेत 46 किलो गटात भारताच्या एन. कुंजुरानी देवीने रौप्यपदक पटकावले.


1958 : बर्लिन येथील जागतिक चित्रपट महोत्सवात ’दो आँखे बारह हाथ’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा सन्मान मिळाला.


1984 : पद्मश्री विजेते गोमंतकीय कवी ‘बाकीबाब’ उर्फ बाळकृष्ण भगवंत बोरकर यांचे निधन.


1910 : स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी ’मोरिया’ या जहाजातुन फ्रान्समधील मार्सेल्सच्या समुद्रात उडी घेतली.


1910 साली स्वातंत्रवीर सावरकरांनी ब्रिटीश सरकारच्या कैदेत असतांना त्यांना फ्रांस येथे जहातून नेत असतांना त्यांनी मोरिया नावाच्या जहाजातून फ्रान्समधील मार्सेल्सच्या समुद्रात उडी मारली.


1954 : साली देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी जगातील सर्वात मोठ्या कालव्यावर भाकरा-नांगल जलविद्युत प्रकल्प सुरु केला.


महत्वाच्या बातम्या :