6th September 2022 Important Events : विविध सणवारांचा ऑगस्ट महिना संपून आजपासून सप्टेंबर महिन्याला सुरुवात झाली आहे. सप्टेंबर महिन्यात गणपतीचे आगमन झाले आहे. घरोघरी गणपती विराजमान झाले आहेत. तसेच पितृपक्ष पंधरवडा सुद्धा याच महिन्यात येतो. या बरोबरच पाकिस्तानच्या ऑपरेशन जिब्राल्टरला भारतीय लष्कराने आजच्या दिवशी म्हणजेच 6 सप्टेंबर 1965 रोजी  चोख प्रत्युत्तर दिले. त्यामुळेच आजचा दिवस देशाच्या इतिहासात लष्कराच्या शौर्याची आठवण करून देतो.  ऑपरेशन जिब्राल्टर हे पाकिस्तानच्या जम्मू-काश्मीरमध्ये घुसखोरी करण्याच्या रणनीतीचे सांकेतिक नाव होते. हे ऑपरेश भारतीय राजवटीविरुद्ध बंडखोरी करण्यासाठी राबवले हाते. त्यात यश आल्यास काश्मीरवर ताबा मिळवण्याची पाकिस्तानला आशा होती. परंतु, पाकिस्तानचे मनसुबे भारतीय सैन्याने उधळून लावले. शेवटी दोन्ही देशामध्ये युद्ध झाले आणि त्यात भारताने पाकिस्तानचा पराभव केला. या व्यतिरिक्त आणखी कोणते महत्वाचे दिवस आहेत हे या माध्यमातून जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात 6 सप्टेंबरचे दिनविशेष.



1889:  सुभाषचंद्र बोस यांचे वडील बंधू स्वातंत्र्यसेनानी बॅ. शरदचंद्र बोस यांचा जन्म 


शरदचंद्र बोस हे भारतीय स्वातंत्र्यसैनिक आणि बॅरिस्टर होते. ते सुभाषचंद्र बोस यांचे मोठे बंधू होते. ते काँग्रेस कार्यकारिणीचे सदस्य आणि बंगाल विधानसभेतील काँग्रेस संसदीय पक्षाचे नेते होते. शरदचंद्र बोस यांचा जन्म 6 सप्टेंबर 1889 रोजी कोलकाता येथे झाला. त्यांचे वडील जानकीनाथ बोस हे कटकचे प्रमुख वकील होते. शरदचंद्र बोस यांचे शिक्षण आणि दीक्षा कटक आणि कलकत्ता येथे पूर्ण झाली. त्यांनी इंग्लंडमधून कायद्याचे शिक्षण घेतले आणि मायदेशी परतल्यानंतर त्यांनी कलकत्ता उच्च न्यायालयातून प्रॅक्टिस सुरू केली. बंगालच्या फाळणीला त्यांचा विरोध होता. त्यांना बंगाल हे भारत आणि पाकिस्तानचे स्वतंत्र राज्य बनवायचे होते. मात्र यामध्ये ते अपयशी ठरले. 


1901 : भारतीय चित्रपटसृष्टीतील पहिल्या स्त्री कलाकार  कमलाबाई रघुनाथ गोखले  यांचा जन्म


कमलाबाई रघुनाथराव गोखले तथा कमला कामत या भारतीय चित्रपटसृष्टीतील प्रथम बाल स्त्री-कलाकार होत्या. कमलाबाईंच्या आई दुर्गाबाई कामत यांना चित्रपट सृष्टीतील पहिल्या महिला कलाकार बनण्याचा मान मिळाला. या दोघींनी एकाच वेळी आणि एकत्र दादासाहेब फाळके यांच्या मोहिनी भस्मासूर या मूकपटात काम केले. 


1968 : पाकिस्तानी फलंदाज सईद अन्वर याचा जन्म 


सईद अन्वर याचा जन्म 6 सप्टेंबर 1968 कराची, पाकिस्तान येथे जाला. हा पाकिस्तानचा माजी सलामीवीर आहे. तो एक डावखुरा फलंदाज आहे, जो 1997 मध्ये चेन्नई येथे भारताविरुद्ध केलेल्या 194 धावांसाठी प्रसिद्ध आहे. आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याने सर्वोच्च धावसंख्या केली आहे. सध्या त्याने केलेली धावसंख्याही दुसऱ्या क्रमांकाची सर्वोच्च धावसंख्या आहे. भारताच्या सचिन तेंडुलकरने 24 फेब्रुवारी 2010 रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 200 धावा करताना अन्वरचा विक्रम मोडला. 


1971 : भारतीय क्रिकेट खेळाडू  देवांग गांधी यांचा जन्म 
देवांग गांधी हे भाराचे माजी क्रिकेटपटू आहेत. त्यांनी देशांतर्गत क्रिकेटमध्ये आश्चर्यकारक कामगिरी केली आणि टीम इंडियामध्ये स्थान मिळवले. मात्र ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर अपयशी ठरल्यानंतर ते बाहेर पडले. पुन्हा टीम इंडियात ते येऊ शकले नाहीत.   


भारतीय पुरुष क्रिकेट संघाचे निवडकर्ते राहिलेल्या देवांगकडून खूप अपेक्षा होत्या. त्यांनी पहिल्या दोन कसोटीत दोन अर्धशतके आणि सलामीला शतकी भागीदारी केली. पण नंतर 1999-2000  ऑस्ट्रेलिया दौरा आला आणि प्रकरण आणखी बिघडले. ऑक्टोबर 1999 मध्ये त्याने भारताच्या कसोटी संघात स्थान मिळवले. समोरचा संघ न्यूझीलंड होता. मोहाली कसोटीतून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाऊल ठेवले. पण मोहाली कसोटीच्या पहिल्या डावात डायन नॅशने कहर केला आणि भारताला स्वस्तात बाद केले. देवांग गांधी सुद्धा त्यावेळी चालला नाही. 14 चेंडू खेळूनही खाते न उघडता ते बाद जाला. मात्र दुसऱ्या डावात त्याने प्रत्युत्तर दिले. देवांगने सदागोपन रमेशसोबत 137 धावांची शतकी भागीदारी केली. यादरम्यान त्याने 242 चेंडूत 75 धावांची खेळी खेळली. त्यावेळी भारताची कसोटी अनिर्णित राहिली. देवांग गांधीच्या चांगल्या खेळाची दखल घेतली गेली आणि तो कानपूर कसोटीतही खेळला.


 1766 : इंग्लिश भौतिक व रसायनशास्त्रज्ञ जॉन डाल्टन यांचा जन्म


1892 : ब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञ नोबेल पुरस्कार प्राप्त सर एडवर्ड ऍपलटन यांचा जन्म


1921 : बारकोडचे सहनिर्माते नॉर्मन जोसेफ वोंडलँड यांचा  जन्म


1921 : बारकोडचे सहसंशोधक नॉर्मन जोसेफ व्हाउडलँड यांचा जन्म 
 
1923 : युगोस्लाव्हियाचे राजा पीटर (दुसरा) यांचा जन्म 


1929 : भारतीय चित्रपट निर्माते यश जोहर यांचा जन्म 
   
1957 : पोर्तुगालचे पंतप्रधान जोशे सॉक्रेटिस  यांचा जन्म 
  
6 सप्टेंबर निधन  
 1901 : अमेरिकेचे 25 वे राष्ट्राध्यक्ष विल्यम मॅककिन्ले यांच्यावर न्यूयॉर्कमध्ये एका व्यक्तीने गोळ्या झाडल्या. आठ दिवसानंतर त्यांचा मृत्यू झाला.
1938 :  फ्रेंच लेखक नोबेल पुरस्कार प्राप्त सली प्रुडहॉम यांचे निधन
1963  : कन्नड कवी आणि राष्ट्रकवी गोविंद पै यांचे निधन 
1972 : जगप्रसिद्ध सरोदवादक व संगीतकार अल्लाउद्दीन खान यांचे निधन
1978  :  अॅडिडासचे संस्थापक अडॉल्फ डॅस्लर यांजे निधन
1990  :   इंग्लिश क्रिकेटपटू लेन हटन यांचे निधन 
2007  :   इटालियन ऑपेरा गायक लुसियानो पाव्हारॉटी यांचे निधन 


महत्वाच्या घटना 


2008 :  अणू पुरवठादार समूहाने भारत आणि अमेरिका यांच्यातील अणु कराराला मान्यता दिली


1990 : प्रसार भारती विधेयक संसदेने मंजूर केले


1997 : अमेरिकेच्या नॅशनल एन्डाऊमेंट फॉर द आर्टस संस्थेची सरोदवादक अमजद अली खान यांना नॅशनल हेरिटेज फेलोशिप मिळाली.


1993 : ज्येष्ठ कवी विंदा करंदीकर यांची कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या जनस्थान पुरस्कारासाठी निवड.


 1970 : पॉप्युलर फ्रंट फॉर द लिबरेशन ऑफ पॅलेस्टाईनने युरोपमधील विमानतळांवरून चार विमानांचे अपहरण केले. अपहरणकर्त्यांनी ही विमाने जॉर्डन आणि इजिप्तमधील विमानतळांवर नेली. ओलिस ठेवलेल्या 382 कैद्यांच्या बदल्यात  त्यांनी तीन स्विस तुरुंगातील पुरुषांची सुटका करण्याची मागणी केली.


1968 : स्वाझीलँड हा देश स्वतंत्र झाला.


1966 : दक्षिण आफ्रिकेच्या पंतप्रधान हेन्ड्रिक व्हेरवोर्डची संसदेत भोसकून हत्या.


1965 : पहिल्या भारत पाकिस्तान युद्धाची सुरुवात झाली


1952 : कॅनडातील पहिले दूरचित्रवाणी केंद्र माँट्रिअल येथे सुरू झाले.


1939 : दुसरे महायुद्ध दक्षिण अफ्रिकेने जर्मनीविरुद्ध युद्ध पुकारले.


1888 : चार्ल्स टर्नरचा एकाच मोसमात २५० क्रिकेट बळीचा विक्रम.


1522 : फर्डिनांड मॅगेलनच्या मोहिमेतील व्हिक्टोरिया हे जगप्रदक्षिणा करणारे पहिले जहाज स्पेनला पोहोचले.


1657 : मुघल शासक शाहजहानच्या अचानक आजारपणामुळे त्याच्या राज्यात अनेक ठिकाणी फुटीरतावादी चळवळी सुरू झाल्या.