3rd September 2022 Important Events : विविध सणवारांचा ऑगस्ट महिना संपून आजपासून सप्टेंबर महिन्याला सुरुवात झाली आहे. सप्टेंबर महिन्यात गणपतीचे आगमन झाले आहे. घरोघरी गणपती विराजमान झाले आहेत. तसेच पितृपक्ष पंधरवडा सुद्धा याच महिन्यात येतो. या व्यतिरिक्त आणखी कोणते महत्वाचे दिवस आहेत हे या माध्यमातून जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात 3 सप्टेंबरचे दिनविशेष.


3 सप्टेंबर : गौरी पूजन


ज्योतिर्भास्कर जयंत साळगांवकर यांनी सांगितलेल्या माहितीनुसार, गौरी पूजन हा महाराष्ट्रातील अनेक महत्त्वाच्या सणांपैकी महत्त्वाचा सण आहे. ही ज्येष्ठा गौरी महाराष्ट्रात विविध जाती जमातीत, विविध ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारांनी पूजली जाते. काही भागात आणि काही समाजात ही गौरी म्हणजे कालीमाता समजून तिला ‘तिखटाचा’ म्हणजे मांसाहाराचा नैवेद्य दाखविला जातो. यंदा गौरीपूजन शनिवार 3 सप्टेंबर रोजी गौरीपूजन आणि सोमवार 5 सप्टेंबर रोजी गौरी विसर्जन होईल.


3 सप्टेंबर : विवेक ओबेरॉय जन्मदिन.


बॉलिवूड सिनेसृष्टीतील अभिनेता विवेक ओबेरॉयचा जन्म हैदराबाद, तेलंगणा येथे झाला. विवेकने आजवर अनेक चित्रपटांत काम केले आहे. 2019 साली विवेकने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित PM Narendra Modi या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली होती.


3 सप्टेंबर : शक्ती कपूर यांचा जन्मदिन.


शक्ती कपूर यांचे खरे नाव सुनील सिकंदरलाल कपूर. परंतु, लोक त्यांना शक्ती कपूर याच नावाने ओळखतात. शक्ती कपूर हे भारतीय चित्रपट अभिनेते. त्यांनी सहसा खलनायकाच्या भूमिका साकारल्या आहेत. आपल्या संपूर्ण कारकिर्दीत त्यांनी 700हून अधिक चित्रपटांमध्ये भूमिका केल्या आहेत. सुपरहिट राजा बापू चित्रपटातील 'नंदू' ची भूमिका चाहत्यांच्या विशेष लक्षात राहिली.


1923 साली संगीत नाटक अकादमी पुरस्कार तसेच पद्मविभूषण पुरस्कार सन्मानित भारतीय शास्त्रीय संगीताच्या बनारस घराण्यातील सुप्रसिद्ध तबला वादक पंडित किशन महाराज यांचा जन्मदिन.


1939 साली जर्मन सम्राट हिटलर यांच्या पोलंड, ब्रिटन आणि फ्रान्सवर केलेल्या हल्ल्याला प्रती उत्तर म्हणून, सत्ता गाजविलेल्या राष्ट्राच्या दोन्ही मित्रपक्षांनी जर्मनीविरुद्ध युद्धाची घोषणा केली.


2004 साली भारतीय पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आणि पाकचे अध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांच्यात या वर्षाच्या सुरुवातीच्या काळात नाजूक शांतता वाढत असताना, भारत आणि पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांनी दिल्ली येथे बैठक घेऊन शांततेचा करार केला.


2006 : भरत जयदेव यांनी गियाना राष्ट्राच्या राष्ट्रपतीपदाची शपथ घेतली 


मूळच्या भारतीय वंशाचे असणारे भरत जगदेव यांनी गियाना या देशाच्या राष्ट्रपतीपदाची शपथ घेतली. 


2009 : आंध्रचे माजी मुख्यमंत्री वायएसआर रेड्डी यांचा अपघाती मृत्यू 


आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री राजशेखर रेड्डी यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाला. ते प्रवास करत असलेले हेलिकॉप्टर नल्लामल्लाच्या जंगलात गायब झालं आणि 3 सप्टेंबर रोजी त्यांचे प्रेत हाती लागलं. त्यांच्या मृत्यूनंतरल काँग्रेस पक्षाचं मोठं नुकसान झालं. तसेच त्यांच्या मृत्यूचे दु:ख पचवू न शकलेल्या त्यांच्या 100 पेक्षा जास्त चाहत्यांनी आत्महत्या केली. 


2014: भारत आणि पाकिस्तामध्ये आलेल्या महापुरामध्ये शंभरहून जास्त लोकांचा मृत्यू झाला. 


2020: भारत आणि रशियाने अत्याधुनिक अशी एके- 203 ही रायफल भारतात निर्मित करण्यासाठी करार केला. 


महत्वाच्या बातम्या :