India vs Pakistan, Asia Cup 2022 : आशिया चषक स्पर्धेत (Asia Cup 2022) ग्रुप ए मधील अखेरच्या सामन्यात पाकिस्तानने हाँगकाँगला 155 धावांनी मात देत सुपर 4 मध्ये एन्ट्री मिळवली आहे. विशेष म्हणजे तब्बल 155 धावांच्या मोठ्या फरकाने पाकिस्तानने विजय मिळवत इतिहासही रचला आहे. पाकिस्तानने टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये एका मोठ्या धावसंख्येच्या फरकाने विजय मिळवला आहे. याआधी भारताच्या 143 धावांच्या फरकाने विजय मिळवलेल्या रेकॉर्डलसा मागे टाकत पाकिस्तानने 155 धावांच्या फरकाच्या विजयाने रेकॉर्ड केला आहे. याआधी श्रीलंकेने 2007 साली केनिया संघाला 172 धावांच्या फरकाने मात दिली होती, हा रेकॉर्ड आजही आबाधित आहे.


सर्वाधिक फरकाने टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमधील विजय



  • 172 श्रीलंका विरुद्ध केनिया, 2007

  • 155 पाकिस्तान विरुद्ध हाँगकाँग, शारजाह 2022

  • 143 भारत विरुद्ध आयर्लंड 2018

  • 143 पाकिस्तान विरुद्ध वेस्ट इंडीज 2018

  • 137 इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडीज 2019


कसा पार पडला सामना?


पाकिस्तान विरुद्ध हाँगकाँग सामन्यात सर्वात आधी हाँगकाँगने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय़ घेतला. पाकिस्तानला कमी धावांत राखून निर्धारीत लक्ष गाठण्याचा त्यांचा डाव होता. पण पाकिस्तानच्या रिझवान आणि फखर जमान यांनी दमदार अर्धशतकं ठोकत अनुक्रमे 78 आणि 53 धावा ठोकल्या. खुशदील याने 35 धावा ठोकत फिनीशिंग टच दिला. ज्यामुळे पाकिस्तानने 20 षटकात 193 धावा केल्या. ज्यानंतर हाँगकाँगचा संघ फलंदाजीला आला असता पाकिस्तानच्या गोलंदाजांनी अप्रतिम गोलंदाजी करत हाँगकाँगच्या एकाही फलंदाजाला साधी दुहेरी आकडेवारीही गाठू दिली नाही. त्यामुळे 10.4 षटकात हाँगकाँग 38 धावांवर सर्वबाद झाला. ज्यामुळे पाकिस्तान 155 धावांनी जिंकला.


आशिया चषक 2022 सुपर-4 चं वेळापत्रक
1) अफगाणिस्तान विरुद्ध श्रीलंका-  3 सप्टेंबर 2022
2) भारत विरुद्ध पाकिस्तान 4 सप्टेंबर 2022
3) भारत विरुद्ध श्रीलंका- 6 सप्टेंबर 2022
4) अफगाणिस्तान विरुद्ध पाकिस्तान 7 सप्टेंबर 2022
5) भारत विरुद्ध अफगाणिस्तान- 8 सप्टेंबर 2022
6) श्रीलंका विरुद्ध पाकिस्तान 9 सप्टेंबर 2022 


हे देखील वाचा-