3rd June 2022 Important Events : जून महिना सुरू झाला आहे. या दरम्यान, प्रत्येक दिवसाचं वेगळं असं महत्व आहे. या दिनविशेषच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला इतिहासातील महत्त्वाच्या घटनांचा आढावा देणार आहोत. जून महिन्यात सामाजिक, आर्थिक आणि दैनंदिन जीवनात त्या दिवसाचं महत्त्व नेमकं काय आहे हे या माध्यमातून जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात 3 जून चे दिनविशेष.
1818 : मराठेशाहीचा अस्त
शेवटचे पेशवे बाजीराव हे मध्यप्रदेशातील असीरगढजवळ ढोलकोट येथे जनरल माल्कम याच्या स्वाधीन झाले आणि त्यांनी मराठी राज्य इंग्रजांकडे सोपवले. त्यानंतर इंग्रजांनी वाड्यावर कब्जा केला आणि तेथे युनिअन जॅक फडकला.
1916 : महर्षी कर्वेंनी भारतातील पहिल्या महिला विद्यापीठाची स्थापना केली.
महर्षी कर्वे यांनी पुण्यात भारतातील पहिल्या महिला विद्यापीठाची स्थापना 1916 साली केली. पुढे विठ्ठलदास ठाकरसी यांनी 15 लाखांचे अनुदान दिल्याने या विद्यापीठाचे नाव श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ (एसएनडीटी) असे झाले.
1940 : डंकर्कची लढाई - जर्मनीचा विजय दोस्त सैन्याने पळ काढला.
1947 : भारताच्या फाळणीची माउंटबॅटन योजना जाहीर
व्हॉइसरॉय माऊंटबॅटन यांनी प्रत्येक नेत्याशी स्वतंत्रपणे प्रदीर्घ चर्चा करून जवळजवळ सर्वच नेत्यांचा विश्वास संपादन केला. आकर्षक व्यक्तिमत्तव, थंड डोक्याने युक्तिवाद करण्याची शैली, भारताच्या प्रश्नाबद्दलची कळकळ आणि इतर कोणत्याही व्हॉइसरॉयच्या तुलनेत माउंटबॅटन यांना मिळालेले विशेष अधिकार यामुळे त्यांना झटपट निर्णय घेणे शक्य झाले. भारतातील चिघळणारी परिस्थिती लक्षात घेऊन 3 जून 1947 रोजी भारत आणि पाकिस्तानच्या फाळणीची योजना मांडली. त्याचवेळी त्यांनी 15 ऑगस्ट 1947 रोजी भारतास स्वातंत्र्य देण्याची घोषणा केली.
1950 : मॉरिस हेझॉंग आणि लुईस लॅचेनल यांनी अन्नपूर्णा या 8,091 मीटर उंच असलेल्या शिखरावर प्रथमच यशस्वी चढाई केली.
1984 : ऑपरेशन ब्ल्यू स्टार - भारतीय सैन्याने आत घुसलेल्या अतिरेक्यांना हुसकावण्यासाठी अमृतसरच्या सुवर्णमंदिरात हल्ला चढवला
ऑपरेशन ब्ल्यू स्टार हे 3 जून ते 6 जून 1984 दरम्यान शीख दहशतवादी व भारतीय लष्करादरम्यान अमृतसरमधील सुवर्णमंदीरात घडलेल्या चकमकीचे नाव आहे. 3 जून 1984 रोजी भारतीय सैन्याने आत घुसलेल्या अतिरेक्यांना हुसकावण्यासाठी अमृतसरच्या सुवर्णमंदिरात हल्ला चढवला.
1989 : थ्येनआनमन चौकात सात आठवडे तळ ठोकलेल्या प्रदर्शकांना घालवण्यासाठी चीनने लष्कर पाठवले.
1990 : चित्रपट निर्माता, दिग्दर्शक आणि चित्रकार बाबूराव पेंटर यांचा जन्म
बाबूराव पेंटर यांचा जन्म 3 जून 1890 साली कोल्हापुरात झाला. त्यांचे मूळ नाव बाबुराव कृष्णराव मेस्त्री असे होते. गंधर्व नाटक कंपनीच्या रंगवलेल्या पडद्यांमुळे बाबूराव पेंटर यांची कलाक्षेत्रात एक वेगळी ओळख निर्माण झाली.
1890 : खान अब्दुल गफार खान तथा सरहद गांधी यांचा जन्म
सरहद गांधी या नावाने प्रसिद्ध असलेले खान अब्दुल गफार खान यांना बादशाह खान म्हणूनदेखील ओळखले जाते. त्यांचा जन्म 3 जून 1890 रोजी झाला. भारतरत्न पुरस्कार मिळालेले ते पहिले अभारतीय होते.
1924 : तामिळनाडूचे 15 वे मुख्यमंत्री एम. करुणानिधी यांचा जन्म
एम. करुणानिधी हे एक भारतीय लेखक आणि राजकारणी होते. ते तामिळनाडूचे 15 वे मुख्यमंत्री होते.
1930 : भारतीय पत्रकार आणि राजकारणी जॉर्ज फर्नांडिस यांचा जन्म
कामगारनेते, पत्रकार आणि संसदपटू असलेले जॉर्ज फर्नांडिस भारताच्या समाजवादी चळवळीतील महत्त्वाचे नेते आहेत. केंद्रीय मंत्री या नात्याने उद्योग, रेल्वे आणि संरक्षण या खात्यांसह अनेक खात्यांचा कार्यभार त्यांनी सांभाळला आहे.
1932 : उद्योगपती सर दोराबजी टाटा यांचे निधन
दोराबजी टाटा हे एक भारतीय उद्योगपती होते. दोराबजींनी टाटा पॉवर हायड्रोलक कंपनीची स्थापना केली.
2014 : भारतीय राजकारणी, महाराष्ट्राचे तिसरे उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांचे निधन
गोपीनाथ मुंडे हे भारतीय राजकारणी होते. 14 मार्च इ.स. 1995 ते इ.स. 1999 या काळात ते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तसेच गृहमंत्रीदेखील होते.
संबंधित बातम्या