KGF 2 : 'केजीएफ 2' (KGF 2) हा सिनेमा सध्या सिनेमागृहात धुमाकूळ घालत आहे. या सिनेमा रिलीज होऊन 50 दिवस पूर्ण झाले आहेत. 14 एप्रिलला प्रदर्शित झालेल्या यशच्या 'केजीएफ 2' सिनेमाने जगभरात 1,235 कोटींची कमाई केली आहे. आता रॉकी भाई ओटीटीवर राज्य करणार आहे. 'केजीएफ 2' हा सिनेमा आता ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. 


सिनेमागृहात 50 दिवस केले पूर्ण


'केजीएफ 2' या सिनेमाने जगभरात सर्वाधिक कमाई करणाऱ्या सिनेमांच्या यादीत स्थान मिळवले आहे. याआधी आमिर खानच्या 'दंगल' आणि प्रभासच्या 'बाहुबली 2' या सिनेमाने जगभरात सर्वाधिक कमाई केली होती. 'केजीएफ 2'च्या हिंदी वर्जनने 430 कोटींचा गल्ला जमवला आहे. 


सिनेमागृहानंतर ओटीटीवर राज्य करणार


सिनेमागृहात धुमाकूळ घातल्यानंतर 'केजीएफ 2' हा सिनेमा आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. हा सिनेमा 3 जूनला हिंदी, तामिळ, तेलुगू आणि कन्नड आणि मल्याळम भाषेत अॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर (Prime Video) प्रदर्शित होणार आहे. 


अॅमेझॉन प्राइमवर 3 जूनला होणार प्रदर्शित


यशचा 'केजीएफ 2' हा सिनेमा अॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर प्रदर्शित होणार आहे. अॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर हा सिनेमा प्रेक्षकांना पाच भाषेत पाहायला मिळणार आहे. 'केजीएफ 2' हा सिनेमा हिंदीतील आतापर्यंतच्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या सिनेमांच्या यादीत सामील झाला आहे.  आता 3 जूनला हा सिनेमा अॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर प्रदर्शित होणर आहे. प्राइम व्हिडीओने सोशल मीडियाच्या माध्यमातून यासंदर्भात माहिती दिली आहे. 


'केजीएफ 2'ची  गाडी बॉक्स ऑफिसवर सुसाट


'केजीएफ 2' सिनेमाने पहिल्या आठवड्यात 59.84 कोटींची कमाई केली आहे. दुसऱ्या आठवड्यात या सिनेमाने 32.65 कोटींची कमाई केली आहे. तर तिसऱ्या आठवड्यात या सिनेमाने 21.30 कोटींची कमाई केली आहे. तर चौथ्या आठवड्यात या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच धमाका केला आहे. चौथ्या आठवड्यात या सिनेमाने 127.12 कोटींची कमाई केली आहे. या सिनेमाच्या निर्मात्यांना चांगलाच नफा मिळाला आहे. या सिनेमात प्रेक्षकांना अॅक्शनचा तडका पाहायला मिळत आहे. 


संबंधित बातम्या


KGF 2 OTT Release : यशचा 'केजीएफ 2' ओटीटीवरील प्रदर्शनाचा मुहूर्त ठरला; अॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर 3 जूनला होणार प्रदर्शित


Hrithik Roshan, KGF 3 : ‘केजीएफ 3’मध्ये हृतिक रोशनची वर्णी? वाचा काय म्हणाले मेकर्स...