28th August 2022 Important Events : ऑगस्ट महिन्यात प्रत्येक दिवसाचं वेगळं असं महत्त्व आहे. या दिनविशेषच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला इतिहासातील महत्त्वाच्या घटनांचा आढावा देणार आहोत. ऑगस्ट महिन्यात सामाजिक, आर्थिक आणि दैनंदिन जीवनात त्या दिवसाचं महत्त्व नेमकं काय आहे हे या माध्यमातून जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात 28 ऑगस्टचे दिनविशेष.


1845 साली अमेरिकन लोकप्रिय विज्ञान मासिक ‘सायंटिफिक अमेरिकन’ चा पहिला अंक प्रकाशित करण्यात आला.


1904 साली कलकत्ता ते बैरकपुर शहरादरम्यान पहिल्या कार रॅलीचे आयोजन करण्यात आलं होत.


1937 साली जपानची जपानी बहुराष्ट्रीय ऑटोमोटिव्ह निर्मिती कंपनी ‘टोयोटा मोटर्स’ ची स्थापना करण्यात आली.


1986 साली भाग्यश्री साठे बुद्धिबळ ग्रँडमॅस्टर बनणाऱ्या पहिल्या भारतीय महिला ठरल्या.


1992 साली श्रीलंकन क्रिकेटपटू आणि फिरकी गोलंदाज मुथया मुरलीधरन यांनी ऑस्ट्रेलिया विरुद्ध कसोटी सामन्यात पदार्पण केले.


1896 साली ज्ञानपीठ पुरस्कार आणि पद्मभूषण पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय उर्दू भाषिक कवी आणि लेखक फिराक गोरखपुरी यांचा जन्मदिन.


1906 साली संगीत नाटक अकादमी पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय महाराष्ट्रीयन मराठी चित्रपट आणि रंगमंच अभिनेते आणि गायक चिंतामणी गोविंद पेंडसे यांचा जन्मदिन.


1913 साली भोपाल रियासतेच्या राजकुमारी आणि भारतातील पहिल्या महिला वैमानिक आबिदा सुल्तान यांचा जन्मदिन.


1926 साली पद्मविभूषण पुरस्कार सन्मानित माजी पोलिस सेवा अधिकारी, गुप्तचर विभाग प्रमुख तसचं, सिक्किम, पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेश राज्याचे माजी राज्यपाल टी. व्ही. राजेश्वर यांचा जन्मदिन.


1928 साली भारतीय शास्त्रीय सितार वादक उस्ताद विलायत ख़ाँ यांचा जन्मदिन.


1928 साली पद्मभूषण आणि  पद्मविभूषण पुरस्कार सन्मानित ‘भारतीय अंतरिक्ष संघटना’ (इस्त्रो) चे भूतपूर्व अध्यक्ष आणि भारतीय भौतिकशास्त्रज्ञ एम. जी. मेनन यांचा जन्मदिन.


1929 साली प्रख्यात भारतीय हिंदी भाषिक लेखक, कथाकार, उपन्यासकार आणि आलोचक राजेंद्र यादव यांचा जन्मदिन.


महत्वाच्या बातम्या :