Ganesh Chaturthi 2022 :  गणपतीला सर्व देवतांमध्ये पहिले पूजनीय देवता मानले जाते. दरवर्षी भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षात गणेश चतुर्थीचा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. यंदा हा सण 31 ऑगस्टला येणार आहे. गणेश उत्सव 11 दिवस साजरा केला जातो. चतुर्थीच्या दिवशी गणपतीचा जन्म झाला. ज्योतिषशास्त्रानुसार या दिवशी गणपतीच्या पूजेमध्ये काही खास गोष्टींचा समावेश करणे आवश्यक आहे. यामुळे पूजेचे फळ मिळते आणि घरात समृद्धी येते. चला जाणून घेऊया गणपतीच्या पूजेमध्ये कोणत्या गोष्टींचा समावेश करावा.



  • गणपतीच्या पूजेत केळीची जोडी जरूर द्यावी, कारण यामुळे बाप्पा प्रसन्न होतो. गणपतीला सर्व फळांमध्ये केळी हे सर्वात आवडते फळ आहे. त्यामुळे श्रीगणेशाच्या पूजेमध्ये केळीची जोडी अर्पण करा. यामुळे गणपतीचा आशीर्वाद मिळेल.

  • हिंदू धर्मात हळदीशिवाय कोणतेही काम शुभ मानले जात नाही. म्हणून गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपतीला हळद अर्पण करावी. या दिवशी बाप्पाला हळदीच्या गाठी अर्पण करणे खूप शुभ मानले जाते. असे मानले जाते की, असे केल्याने भक्तांचे सर्व संकट दूर होतात आणि घरात सुख-समृद्धी येते.

  • प्रत्येक पूजेत नारळाचा वापर नक्कीच केला जातो. पुराणात नारळाचे वर्णन लक्ष्मी देवीचे फळ म्हणून केले आहे. गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपतीला संपूर्ण नारळ अर्पण करणे शुभ मानले जाते. असे केल्याने घरात धनाचा वर्षाव होतो.

  • गणपतीला मोदक आणि लाडू खूप प्रिय आहेत, म्हणून या दोन्ही गोष्टी त्याच्या पूजेत द्यायला हव्यात. असे मानले जाते की गणपतीला लाडू किंवा मोदक अर्पण केल्याने भक्ताची प्रत्येक इच्छा पूर्ण होते.

  • हिंदू धर्मात सुपारी हे गणेशाचे प्रतीक मानले जाते. गणेश चतुर्थीच्या पूजेच्या साहित्यात सुपारीचा समावेश करायला विसरू नका. बाप्पाला सुपारी अर्पण केल्याने आशीर्वाद मिळतो आणि घरात समृद्धी येते असे म्हणतात.

  • पुराणानुसार गणेशाला दुर्वा अतिशय प्रिय आहे. श्री गणेशाच्या पूजेत दुर्वा समाविष्ट करायला विसरू नका. गणपतीला दुर्वा अर्पण केल्याने प्रत्येक संकटातून मुक्ती मिळते. 


 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.) 









Ashwattha Maruti Poojan 2022 : श्रावणातील शनिवार म्हणजे अश्र्वत्थ मारूती पूजनाचा दिवस; काय आहे यामागची आख्यायिका? जाणून घ्या


Lucky zodiac sign : 'या' तीन राशीच्या लोकांना प्रत्येक गोष्टीत नशीब देते साथ