27th July 2022 Important Events : जून महिन्यात प्रत्येक दिवसाचं वेगळं असं महत्त्व आहे. आज 27 जुलै 1761 साली माधवराव बल्लाळ भट ऊर्फ थोरले माधवराव हे मराठा साम्राज्यातील चौथे पेशवे बनले. तसेच याच दिवशी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा जन्मदिन सुद्धा आहे. या व्यतिरिक्त आणखी कोणते महत्वाचे दिवस आहेत हे या माध्यमातून जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात 27 जुलैचे दिनविशेष.


27 जुलै : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा जन्मदिन. 


उद्धव ठाकरे हे महाराष्ट्रातील शिवसेना पक्षाचे पक्षप्रमुख आहेत. 2003 साली शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांस कडून शिवसेनेच्या कार्याध्यक्षपदाची सूत्रे उद्धव ठाकरे यांच्याकडे देण्यात आली. ठाकरे यांनी 28 नोव्हेंबर 2019 रोजी महाराष्ट्र राज्याचे 19वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. 


1761 : माधवराव बल्लाळ भट ऊर्फ थोरले माधवराव हे मराठा साम्राज्यातील चौथे पेशवे बनले.


मराठेशाहीतील चौथा कर्तबगार पेशवा. बाळाजी बाजीराव उर्फ नानासाहेब आणि गोपिकाबाई यांचा दुसरा मुलगा. त्याचा जन्म सावनूर (धारवाड जिल्हा) येथे झाला. माधवराव पेशव्याने मराठ्यांची दक्षिणेतील सत्ता भक्कम केली. माधवरावाने आपल्या कारकिर्दीमध्ये निजाम हैदर अली यांचा बंदोबस्त केला. माधवरावांनी उत्तरे मध्ये मराठ्यांचे प्रभुत्व स्थापित केले. पानिपतच्या लढाईमध्ये झालेला पराभव आणि त्यातून मराठी सत्तेची झालेली मानहानी भरून काढण्याचे काम आणि मराठी सत्तेला वैभव प्राप्त करून देण्यासाठी विशेष असे प्रयत्न माधवराव पेशवे यांनी केले. मराठ्यांच्या इतिहासात एक प्रामाणिक जिद्दी आणि प्रजाहित दक्ष असा शासक म्हणून माधवरावांचा उल्लेख केला जातो. 


1949 : पहिल्या प्रवासी जेट विमान, डी हॅविललँड कॉमेटचे पहिले उड्डाण.


2001 : सार्वजनिक ठिकाणे, शासकीय इमारती, या ठिकाणी सिगारेट, तंबाखू, गुटखा सेवन या वस्तूंची सार्वजनिक ठिकाणी जाहिरात करण्यावर बंदी घालण्याचा महाराष्ट्र मंत्रिमंडळाचा निर्णय.


1921 : रक्तातील साखरेवर ’इन्सुलिन’ या संप्रेरकाचे नियंत्रण असते असे टोरांटो विद्यापीठातील सर फ्रेड्रिक बँटिंग आणि चार्ल्स बेस्ट यांनी सिद्ध केले. तसेच त्यांनी ’इन्सुलिन’ शुद्ध स्वरुपात विभक्त करण्यात यश मिळवले.


महत्वाच्या बातम्या :