26th July 2022 Important Events : जुलै (July) महिना सुरू झाला आहे. या दरम्यान, प्रत्येक दिवसाचं वेगळं असं महत्व आहे. या दिनविशेषच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला इतिहासातील महत्त्वाच्या घटनांचा आढावा देणार आहोत. जुलै महिन्यात सामाजिक, आर्थिक आणि दैनंदिन जीवनात त्या दिवसाचं महत्त्व नेमकं काय आहे हे या माध्यमातून जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात 26 जुलैचे दिनविशेष.
कारगिल विजय दिवस
कारगिलच्या लढाईत भारताने मिळवलेला विजय 'कारगिल विजय दिवस' म्हणून साजरा केला जातो. कारगिल विजय दिवस हा भारतीय सैन्यांच्या शौर्याची आठवण सदैव जागृत ठेवणारा दिवस असून देशाबद्दल त्यागाची आणि सैनिकांप्रती कृतज्ञतेची भावना जागृत करणारा दिवस आहे.
1509 : विजयनगर साम्राज्य
दक्षिण भारतातील हंपी ही राजधानी असलेले राज्य हे विजयनगर साम्राज्य म्हणून ओळखले जाते.
1745 : पहिला महिला क्रिकेट सामना
26 जुलै 1745 साली पहिला महिला क्रिकेट सामना खेळवण्यात आला होता. गिल्डफोर्ड, इंग्लंड येथे पहिला क्रिकेट सामना रंगला होता.
1892 : दादाभाई नौरोजी ब्रिटनमधील पहिले सदस्य म्हणून निवडून आले.
26 जुलै 1892 साली दादाभाई नौरोजी ब्रिटनमधील पहिले सदस्य म्हणून निवडून आले. दादाभाई नौरोजी यांना भारताचे पितामह म्हणून ओळखले जाते.
2005 : मुंबई ढगफुटी
26 जुलै 2005 रोजी मुंबईत झालेला पाऊस ही ढगफुटी होती. आज या घटनेला 12 वर्षे झाले आहे. 26 जुलै रोजी सातत्याने पाऊस कोसळत होता. मुंबईसह सर्वच परिसरात पावसाने जोर धरला होता. रस्त्यांवर पाणी साचलं होतं. त्यामुळे वाहतुकीचा खोळंबा झाला. अनेकांच्या गाड्या रस्त्यात बंद पडल्या, तर काहींनी भररस्त्यात गाड्या सोडून चालत घर गाठणं पसंत केलं. पश्चिम, मध्य आणि हार्बर या तिन्ही रेल्वेमार्गावरील लोकल वाहतूक ठप्प होती.
2008 : अहमदाबाद बॉम्बस्फोट
26 जुलै 2008 रोजी अहमदाबादमध्ये संध्याकाळी 6.45 वाजता पहिला बॉम्बस्फोट झाला. मणिनगरमध्ये हा स्फोट झाला. मणिनगर हा तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचा मतदारसंघ होता. यानंतर 70 मिनिटं आणखी 20 बॉम्बस्फोट झाले. या स्फोटांमध्ये 56 जणांचा मृत्यू झाला असून 200 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. 2002 मधील गोध्रा घटनेचा बदला घेण्यासाठी इंडियन मुजाहिद्दीनने हे बॉम्बस्फोट घडवून आणले होते.
1927 : गुलाबराय रामचंद्र यांचा जन्मदिन
गुलाबराय रामचंद्र हे भारतीय क्रिकेट खेळाडू होते. 26 जुलै 1927 रोजी त्यांचा जन्म झाला तर 8 सप्टेंबर 2003 रोजी त्यांचे निधन झाले.
1986 : मुग्धा गोडसे यांचा जन्म
मुग्धा गोडसे हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री आहे. अनेक हिंदी सिनेमांत तिने काम केलं आहे. 'फॅशन' सिनेमाच्या माध्यमातून मुग्धा गोडसेने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.
1994 : पं. कृष्णराव शंकर पंडित यांचा जन्मदिन
पं. कृष्णराव शंकर पंडित हे ग्वाल्हेर घराण्याचे शास्त्रीय गायक होते. 26 जुलै 1994 रोजी त्यांचा जन्म झाला तर 22 ऑगस्ट 1989 रोजी त्यांचे निधन झाले.
2015 : बिजॉय कृष्णा हांडिक यांचे निधन
बिजॉय कृष्णा हांडिक हे भारतीय वकील आणि राजकारणी होते. 26 जुलै 2015 रोजी त्यांचे निधन झाले.
संबंधित बातम्या