21th July 2022 Important Events : जुलै महिना सुरू झाला आहे. या दरम्यान, प्रत्येक दिवसाचं वेगळं असं महत्व आहे. या दिनविशेषच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला इतिहासातील महत्त्वाच्या घटनांचा आढावा देणार आहोत. जुलै महिन्यात सामाजिक, आर्थिक आणि दैनंदिन जीवनात त्या दिवसाचं महत्त्व नेमकं काय आहे हे या माध्यमातून जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात 21 जुलैचे दिनविशेष.


1883 : कोलकाता येथे पहिल्या नाट्यगृहाची स्थापना 


21 जुलै 1883 साली कोलकाता येथे पहिल्या नाट्यगृहाची स्थापना झाली. 'दक्ष यज्ञ' हे नाटक त्यावेळी प्रेक्षकांना दाखवण्यात आले. या नाटकाचे लेखन गिरिश चंद्र घोष यांनी केले होते. 


1884 : लॉर्डस मैदानात पहिला कसोटी सामना


सेंट जॉन्सवूड यांनी लंडनमध्ये लॉर्डस मैदानाचा शोध लावला. त्यामुळेच या मैदानाचे नाव लॉर्डस ठेवण्यात आले. या लॉर्डस मैदानावर पहिला कसोटी सामना खेळवण्यात आला. 


1954 : व्हिएतनामची फाळणी


1954 : पहिले इंडोचिनी युद्ध - जिनिव्हा परिषदेने व्हिएतनाम देशाचे उत्तर व्हिएतनाम आणि दक्षिण व्हिएतनाममध्ये विभाजन केले. 21 जुलै 1954 रोजी जिनिव्हा येथे झालेल्या एका परिषदेत इंडोचीनची फाळणी करण्याचे ठरले. 


1960 : सिरिमावो भंडारनायके जगातील पहिल्या महिला पंतप्रधान बनल्या


21 जुलै 1960 रोजी सिरिमावो भंडारनायके यांची श्रीलंकेच्या पंतप्रधान पदावर निवड झाली. तसेच त्या जगातील पहिल्या महिला पंतप्रधान बनल्या.


1962 : भारत चीन सीमावाद


भारत-चीन युद्ध हे इ.स. 1962 साली भारत व चीन या देशांमध्ये झालेले युद्ध होते. हे युद्ध भारत चीन सीमावाद म्हणूनही ओळखले जाते. 


2007 : प्रतिभा पाटील भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती बनल्या


21 जुलै 2007 रोजी प्रतिभा पाटील यांनी राष्ट्रपतीपदाची जबाबदारी स्वीकारली. भारताच्या राष्ट्रपतीपदावर नेमल्या गेलेल्या त्या पहिल्या महिला होत्या. 


1934 : चंदू बोर्डे यांचा जन्मदिन


चंदू बोर्डे हे भारतीय क्रिकेटपटू होते. त्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांमध्ये इ.स 1969 पर्यंत भारताचे प्रतिनिधित्व केले होते. पद्मभूषण, पद्मश्री अशा अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. 


1930 : रामचंद्र ढेरे ढेरे यांचा जन्म


रामचंद्र ढेरे हे मराठी इतिहास, संशोधक व लेखक होते. तसेच ते भारतीय संस्कृतीचे अभ्यासक होते. 


1920 : गीतकार आनंद बक्षी यांचा जन्म


1911 : उमाशंकर जोशी यांचा जन्मदिन


उमाशंकर जोशी हे भारतीय लेखक, कवी आणि विद्वान होते. त्यांना ज्ञानपीठ पुरस्कारदेखील प्रदान करण्यात आला होता. 


1997 : राजा राजवाडे यांचे निधन 


राजा राजवाडे यांनी अनेक कांदबऱ्या, कथासंग्रह, कविता संग्रह, ललित गद्य लिहिले आहेत. तसेच त्यांनी सलग 35 वर्षे 18 नियतकालिकांतून स्तंभलेखन केलं आहे. 


संबंधित बातम्या


20th July 2022 Important Events : 20 जुलै दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना


19th July 2022 Important Events : 19 जुलै दिनविशेष, जाणून घ्या महत्वाच्या घटना