JEE Main 2022 Session 2 Exam : नॅशनल टेस्टिंग एजन्सी'ने केलेल्या घोषणेनुसार जेईई मेन 2022 दुसऱ्या सत्राची परीक्षा सोमवार 25 जुलै 2022 पासून सुरू होणार आहे. आधी जेईई मेन दुसऱ्या सत्राची परीक्षा गुरुवार 21 जुलै 2022 पासून सुरू होणार होती. परीक्षेच्या तारखेत बदल करण्याचे कारण एनटीएने जाहीर केलेले नाही. पहिल्या सत्राची परीक्षा 23 ते 29 जून दरम्यान झाली होती त्यानंतर नुकताच या परीक्षेचा निकाल जाहीर झाला
जेईई मेन दुसऱ्या सत्राची परीक्षा भारताबाहेरच्या 17 शहरांसह देशातील 500 शहरांमध्ये वेगवेगळ्या केंद्रांवर होणार आहे. ही परीक्षा 6.29 लाख विद्यार्थी देणार आहेत. ज्या विद्यार्थ्यांनी जेईई मेनच्या दुसऱ्या सत्राच्या परीक्षेसाठी अर्ज केला आहे त्यांनी jeemain.nta.nic.in वरून अॅडमिट कार्ड 21 जुलै पासून डाऊनलोड करण्यात येतील. परीक्षेबाबतची अधिकृत माहिती याच वेबसाईटवर उपलब्ध आहे.
नॅशनल टेस्टिंग एजन्सी' तर्फे JEE MAIN 2022 चे प्रवेशपत्र 21 जुलै 2022 जाहीर करण्यात येणार आहे. अॅडमिट कार्ड NTA च्या अधिकृत वेबसाईट jeemain.nta.nic.in आणि nta.ac.in या वेबसाईटवर जाहीर करण्यात येणार आहे. JEE मेन 2 चे देशभरातील 500 शहरांमध्ये आणि विदेशातील 17 शहरांमध्ये आयोजम करण्यात आले आहे. या परीक्षेला 6,29,778 विद्यार्थी बसणार आहे.
प्रवेशपत्र कसे डाउनलोड करावे?
1. JEE Mains प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी NTA वेबसाइट nta.ac.in ला भेट द्या.
2. त्यानंतर उमेदवाराच्या मुख्यपृष्ठावरील प्रवेशपत्र लिंकवर क्लिक करा.
3. आयडी पासवर्ड सारखी विनंती केलेली माहिती प्रविष्ट करा.
4 . प्रवेशपत्र तुमच्या स्क्रीनवर प्रदर्शित होईल.
5. त्यानंतर उमेदवारांनी प्रवेशपत्र डाउनलोड करून प्रिंटआउट घेणे आवश्यक आहे.
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI