20th June 2022 Important Events : जून महिना सुरु झाला आहे. या दरम्यान, प्रत्येक दिवसाचं वेगळं असं महत्व आहे. या दिनविशेषच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला इतिहासातील महत्त्वाच्या घटनांचा आढावा देणार आहोत. जून महिन्यात सामाजिक, आर्थिक आणि दैनंदिन जीवनात त्या दिवसाचं महत्त्व नेमकं काय आहे हे या माध्यमातून जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात 20 जून चे दिनविशेष.


20 जून : जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळा


अखंड वारकरी सांप्रदाय ज्याची आस लावून होता त्या आषाढी वारीची घोषणा झाली आहे. जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची पालखी 20 जूनला पंढरीकडे प्रस्थान ठेवणार आहे. देहू संस्थांनने या सोहळ्याची घोषणा केली आहे. त्यामुळे वारकाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. शेकडो वर्षांपासून जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा अखंडितपणे पार पडतोय. यंदा हा पालखी सोहळा देहूतून 20 जूनला पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. 


1899 : केंब्रिज विद्यापीठाच्या ’ट्रायपॉस’ या गणिताच्या अंतिम परीक्षेत रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे पहिल्या वर्गात पहिले आल्यामुळे त्यांना सिनिअर रॅंग्लर होण्याचा बहुमान मिळाला.


1960 : साली महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाची स्थापना करण्यात आली.


1921 :  साली  लोकमान्य टिळक यांनी पुरस्कारिलेले राष्ट्रीय शिक्षण विद्यार्थ्यांना देण्यासाठी पुण्यात टिळक महाराष्ट्र विद्यापीठाची स्थापना करण्यात आली.


2001 : साली पाकिस्तान देशाचे सेना प्रमुख जनरल परवेज मुशर्रफ हे पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष बनले.


2014 : साली प्रसिद्ध कवी केदारनाथ सिंह यांना ज्ञानपीठ पुरस्कार घोषित करण्यात आला.


1939 : साली माजी भारतीय कसोटी क्रिकेटपटू व गोलंदाज तसचं, राष्ट्रीय निवड समितीचे अध्यक्ष रमाकांत भिकाजी देसाई यांचा जन्मदिन.


1952 : साली पद्मश्री पुरस्कार व साहित्य अकादमी पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध भारतीय कादंबरीकार आणि कवी विक्रम सेठ यांचा जन्मदिन.


महत्वाच्या बातम्या :