20th August 2022 Important Events : ऑगस्ट महिना सुरु झाला आहे. आणि ऑगस्ट महिन्यातील आजचा दिवस म्हणजेच 20 ऑगस्ट. श्रावणातील प्रत्येक शनिवारी अश्र्वत्थाची पूजा करण्याची प्रथा आहे. दुधामध्ये बेलाचे पान घालून ते दूध पिंपळाच्या मुळात घालावे. त्यामुळे त्या दुधाचा सुगंध पिंपळाला मिळतो. पिंपळाची पूजा करणे म्हणजे विष्णूपूजा करणे असे मानले जाते. याशिवाय 1946 साली प्रख्यात भारतीय उद्योगपती आणि इन्फोसिस कंपनीचे संस्थापक, अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी एन. आर. नारायणमूर्ती यांचा जन्मदिन. या व्यतिरिक्त आणखी कोणते महत्वाचे दिवस आहेत हे या माध्यमातून जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात 20 ऑगस्ट दिनविशेष.


अश्वत्थ मारूती पूजन :


श्रावणातील प्रत्येक शनिवारी अश्र्वत्थाची पूजा करण्याची प्रथा आहे. दुधामध्ये बेलाचे पान घालून ते दूध पिंपळाच्या मुळात घालावे. त्यामुळे त्या दुधाचा सुगंध पिंपळाला मिळतो. पिंपळाची पूजा करणे म्हणजे विष्णूपूजा करणे असे मानले जाते. पिंपळाच्या खाली मारुती असल्यास त्याचीही पूजा करण्याची प्रथा आहे. तसेच मारुती नसल्यास पिंपळाची आणि मारुतीची अशा वेगवेगळ्या पूजादेखील केल्या जातात. 


1828 साली राजा राम मोहन रॉय, द्वारकानाथ टागोर आणि कालीनाथ रॉय यांनी ब्राह्मो समाजाची स्थापना केली. ब्रह्मसमाजाचे पहिले अधिवेशन कोलकाता येथे आयोजित करण्यात आले.


1897 साली ब्रिटीश वैद्यकीय डॉक्टर सर रोनाल्ड रॉस(Ronald Ross) यांनी भारतात हिवतापाच्या जीवाणूचा शोध लावला.


1940 साली पद्मभूषण आणि पद्मविभूषण पुरस्कार तसचं, शांततेचा नोबल पुरस्कार विजेते प्रसिद्ध भारतीय हवामान बदलांच्या आंतर-सरकारी पॅनेलचे अध्यक्ष राजेंद्र कुमार पचौरी यांचा जन्मदिन.


1946 साली प्रख्यात भारतीय उद्योगपती आणि इन्फोसिस कंपनीचे संस्थापक, अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी एन. आर. नारायणमूर्ती यांचा जन्मदिन.


2013 साली पद्मश्री पुरस्कार सन्मानित महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची संस्थापक, सामाजिक कार्यकर्ते आणि लेखक तसचं, साधना साप्ताहिकाचे संपादक डॉ. नरेंद्र दाभोळकर यांची पुणे येथे गोळ्या मारून हत्या करण्यात आली.


महत्वाच्या बातम्या :