18th July 2022 Important Events : जुलै महिना सुरु झाला आहे. या दरम्यान, प्रत्येक दिवसाचं वेगळं असं महत्व आहे. आज 18 जुलै म्हणजेच आंतरराष्ट्रीय नेल्सन मंडेला दिन. आंतरराष्ट्रीय स्तरावर लोकशाहीसाठी संघर्ष आणि जगभरातील शांतता वाढविण्यात नेल्सन मंडेला यांनी दिलेल्या योगदानाच्या स्मरणार्थ हा दिवस पाळण्यात येतो. 18 जुलै 2009 रोजी न्यूयॉर्कमध्ये प्रथम मंडेला दिन साजरा करण्यात आला. या व्यतिरिक्त आणखी कोणते महत्वाचे दिवस आहेत हे या माध्यमातून जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात 18 जुलैचे दिनविशेष.
18 जुलै : अण्णाभाऊ साठ्ये स्मृतिदिन.
तुकाराम भाऊराव साठे हे अण्णा भाऊ साठे म्हणून ओळखले जाणारे एक मराठी समाजसुधारक, लोककवी आणि लेखक होते. साठे एका मांग (दलित) समाजामध्ये जन्मलेले व्यक्ती होते. त्यांचे लेखन सामाजिक आणि राजकीयदृष्ट्या कृतिशीलतेवर आधारलेले होते.
18 जुलै : आंतरराष्ट्रीय नेल्सन मंडेला दिन.
संयुक्त राष्ट्रसंघातर्फे 18 जुलै हा दिवस आंतरराष्ट्रीय नेल्सन मंडेला दिन म्हणून साजरा केला जातो. आंतरराष्ट्रीय स्तरावर लोकशाहीसाठी संघर्ष आणि जगभरातील शांतता वाढविण्यात नेल्सन मंडेला यांनी दिलेल्या योगदानाच्या स्मरणार्थ हा दिवस पाळण्यात येतो. 18 जुलै 2009 रोजी न्यूयॉर्कमध्ये प्रथम मंडेला दिन साजरा करण्यात आला. संयुक्त राष्ट्र महासभेने 10 नोव्हेंबर 2009 रोजी एक ठराव संमत करून 18 जुलैला “आंतरराष्ट्रीय नेल्सन मंडेला दिवस” म्हणून घोषित केले.
18 जुलै : बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा जन्मदिन.
प्रियांका चोप्रा जोनास ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आणि मॉडेल आहे. मिस वर्ल्ड ही आंतरराष्ट्रीय सौंदर्य स्पर्धा जिंकणारी ती 5 भारतीय महिलांपैकी एक आहे. प्रियांका चोप्राने 2003 साली 'द हीरो' चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. ती बॉलिवूडमधील सर्वाधिक मानधन स्वीकारणारी आणि सर्वात लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक मानली जाते. प्रियांका चोप्राला दोनदा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. मिस वर्ल्ड 2000 स्पर्धेची विजेती, चोप्रा ही भारतातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे.
1857 : साली मुंबई येथील मुंबई विश्वविद्यालयाची स्थापना करण्यात आली.
1980 : साली भारतीय अंतराळ संस्था इस्रो ने एस. एल. व्ही. -3 या अवकाशयानाद्वारे रोहिणी-1 या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले.
1918 : साली शांततेचा नोबल पुरस्कार विजेते दक्षिण आफ्रिकेतील माजी राष्ट्राध्यक्ष नेल्सन मंडेला(Nelson Mandela) यांचा जन्मदिन.
2012 : साली भारतीय हिंदी चित्रपट क्षेत्रातील पहिले सुपरस्टार म्हणून ओळख निर्माण करणारे प्रसिद्ध भारतीय चित्रपट अभिनेते, निर्माते आणि राजकारणी राजेश खन्ना यांचे निधन.
महत्वाच्या बातम्या :