16th July 2022 Important Events :  जुलै महिना सुरु झाला आहे. या दरम्यान, प्रत्येक दिवसाचं वेगळं असं महत्व आहे. आज 16 जुलै म्हणजेच आषाढ वद्य चतुर्थीचा दिवस. प्रत्येक मराठी महिन्याची वद्य चतुर्थी ही संकष्ट चतुर्थी म्हणून साजरी केली जाते. गणेश भक्त या दिवशी संपूर्ण दिवस उपवास करतात. या व्यतिरिक्त आणखी कोणते महत्वाचे दिवस आहेत हे या माध्यमातून जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात 16 जुलैचे दिनविशेष.


16 जुलै :  संकष्ट चतुर्थी


शनिवार, 16 जुलै 2022 रोजी आषाढ वद्य चतुर्थी आहे. प्रत्येक मराठी महिन्याची वद्य चतुर्थी ही संकष्ट चतुर्थी म्हणून साजरी केली जाते. गणेश भक्त या दिवशी संपूर्ण दिवस उपवास करतात. गणपतीचे नामस्मरण करून संकष्ट चतुर्थी व्रत आचरिले जाते. गणपती उपासकांसाठी संकष्ट चतुर्थीला अधिक महत्त्व असते. चंद्रोदयानंतर उपवास सोडला जातो. महाराष्ट्रात प्रत्येक शहरात चंद्रोदयाची वेळ वेगवेगळी असल्याने त्या त्या वेळेनुसार चंद्रोदय झाल्यानंतरच नैवेद्य दाखवला जातो. यानंतर गणेश उपासक, भाविक दिवसभराचा उपवास सोडतात.


1969 : चंद्रावर पहिला मानव उतरवणाऱ्या अपोलो-11 अंतराळयानाचे फ्लोरिडा येथून प्रक्षेपण.


1909 : अरुणा असफ अली – स्वातंत्र्यसेनानी. 9 ऑगस्ट 1942 रोजी त्यांनी मुंबईतील गोवालिया टँक मैदानावर तिरंगा फडकवला होता. लेनिन शांतता पुरस्कार, इंदिरा गांधी शांतता पुरस्कार, पद्मविभूषण, आंतरराष्ट्रीय सद्भावना पुरस्कार, भारतरत्‍न (मरणोत्तर) इ. पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले. 


1993 : उस्ताद निसार हुसेन खाँ – पद्मभूषण (1970), रामपूर साहसवान घराण्याचे तराणा व ख्यालगायक, संगीत संशोधन अकादमीचे (SRA) निवासी शिक्षक, आकाशवाणी कलाकार, उस्ताद राशिद खाँ यांचे गुरू.


इस. पूर्व 622 साली मुस्लीम धर्माचे संस्थापक मुहम्मद पैगंबर यांनी मके वरून मादिनाला प्रयाण केलं. या दिवसापासून चंद्रावर आधारित असलेल्या इस्लामिक (हिजरी) कॅलेंडर ची सुरुवात झाली.


सन 1914 साली प्रसिद्ध महाराष्ट्रीयन मराठी लघुकथा, लोककथा, आणि बालवाड़्मय, चरित्र, अनुवाद इत्यादी साहित्याचे लिखाण करणारे महान विचारवंत आणि स्वातंत्र्यसैनिक वामनराव कृष्णाजी उर्फ वा. कृ. चोरघडे यांचा जन्मदिन.


सन 1983 साली ब्रिटीश वंशीय भारतीय हिंदी चित्रपट अभिनेत्री कतरिना कैफ यांचा जन्मदिन.


महत्वाच्या बातम्या :