10th August 2022 Important Events : ऑगस्ट महिना सुरु झाला आहे. याचबरोबर श्रावण महिन्यालाही सुरुवात झाली आहे. आज 10 ऑगस्ट म्हणजेच बुधपूजन. हिंदू धर्मग्रंथानुसार, श्रावणातील प्रत्येक बुधवारी बुधाची पूजा केली जाते. या व्यतिरिक्त आणखी कोणते महत्वाचे दिवस आहेत हे या माध्यमातून जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात 10 ऑगस्ट दिनविशेष.


बुधपूजन : 


श्रावणातील प्रत्येक बुधवारी बुधाची पूजा केली जाते. धनसंपदा, बुद्धिचातुर्य, विद्याधन हे सर्वांनाच हवे असते. ते देण्याबद्दल ज्यांचा लौकिक आहे अशा बुध आणि बृहस्पती ह्यांची ही पूजा अनेक घरात पूर्वापार परंपरेने केली जाते. ज्यांना मनःशांतीसाठी हे व्रत करावेसे वाटेल त्यांनी ते करावे.


1999 : औषधांच्या दुकानांत विकल्या जाणार्‍या औषधांत प्राणिज पदार्थ असल्यास त्याचा उल्लेख वेष्टणावर करणे अनिवार्य असल्याचा केंद्रसरकारच्या सामाजिक न्याय खात्याचा निर्णय.


इ.स. 1846 साली युनायटेड स्टेट्स सरकारद्वारे प्रशासित संग्रहालये आणि संशोधन केंद्रांचा एक गट असलेल्या ‘स्मिथसोनियन संस्थेची’ स्थापना करण्यात आली.


सन 1979 साली प्रथम भारतीय प्रायोगिक उपग्रह प्रक्षेपण वाहन एसएलवी-3 प्रक्षेपित करण्यात आले.


सन 1999 साली ‘इंडियन फिजिक्स असोसिएशन’ तर्फे देण्यात येणारा ‘डॉ. मो. वा. चिपळोणकर स्मृती पुरस्कार’ डॉ. निवास पाटील आणि डॉ. प्रकाश तुपे यांना जाहीर करण्यात आला.


इ.स.1860 साली भारतीय हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या पहिल्या आधुनिक ग्रंथाचे लिखाण करणारे भारतीय संगीतशास्त्रज्ञ पंडित विष्णू नारायण भातखंडे यांचा जन्मदिन.


सन 1962 साली भारतातील माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील एक अग्रणी व्यक्तिमत्त्व आणि नॅशनल असोसिएशन ऑफ सॉफ्टवेअर अँड सर्विस कंपनीज (NASSCOM) चे अध्यक्ष देवांग मेहता यांचा जन्मदिन.


सन 1977 साली पद्मश्री पुरस्कार सन्मानित प्रख्यात भारतीय ध्वज गीत “विजयी विश्व तिरंगा प्यारा” गीताचे रचनाकार, कवी आणि गीतकार श्यामलाल गुप्ता यांचे निधन.


महत्वाच्या बातम्या :