Job Majha : अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या शोधात आहेत. मात्र, कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच 'एबीपी माझा'ने पुढाकार घेत, नोकरीची संधी कुठे आहेत याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुण नोकरीसाठी या ठिकाणी अर्ज करु शकतील. 


फर्टिलायजर्स अँड केमिकल्स त्रावणकोर आणि डॉ. आंबेडकर कॉलेज ऑफ लॉ, मुंबई या ठिकाणी भरती सुरु आहे. त्यासाठी काय पात्रता आहे, अर्ज कसा आणि कुठे करायचा याची माहिती सविस्तरपणे,


फर्टिलायजर्स अँड केमिकल्स त्रावणकोर लि.


विविध पदांच्या 137 जागांसाठी भरती निघाली आहे.


पहिली पोस्ट - सिनियर मॅनेजर


शैक्षणिक पात्रता - इंजिनिअरिंग पदवी/PG पदवी /PG डिप्लोमा, 9 वर्षांचा अनुभव


एकूण जागा - 9


वयोमर्यादा - 45 वर्षांपर्यंत


अर्ज करण्याची शेवटची तारीख - 29 जुलै 2022


तपशील - fact.co.in


दुसरी पोस्ट - ऑफिसर


शैक्षणिक पात्रता - B.Sc (कृषी)


एकूण जागा - 8


वयोमर्यादा - 26 वर्षांपर्यंत


अर्ज करण्याची शेवटची तारीख - 29 जुलै 2022


तपशील - fact.co.in


तिसरी पोस्ट - मॅनेजमेंट ट्रेनी


शैक्षणिक पात्रता - 60 टक्के गुणांसह संबंधित विषयात इंजिनिअरिंग पदवी / मॅनेजमेंटमध्ये पदव्युत्तर पदवी/डिप्लोमा


एकूण जागा - 58


वयोमर्यादा - 26 वर्षांपर्यंत


अर्ज करण्याची शेवटची तारीख - 29 जुलै 2022


तपशील - fact.co.in


चौथी पोस्ट - टेक्निशियन


शैक्षणिक पात्रता - B.Sc.(Chemistry/Industrial Chemistry) / संबंधित विषयात इंजिनिअरिंग डिप्लोमा, 2 वर्षांचा अनुभव


एकूण जागा - 62


वयोमर्यादा - 35 वर्षांपर्यंत


ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे


अर्ज करण्याची शेवटची तारीख - 29 जुलै 2022


तपशील - fact.co.in (या वेबसाईटवर गेल्यावर careers मध्ये job openings वर क्लिक करा. संबंधित पोस्टसंदर्भातली जाहिरात दिसेल. recruitment notifications वर क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)


डॉ. आंबेडकर कॉलेज ऑफ लॉ मुंबई


पोस्ट - सहाय्यक प्राध्यापक


शैक्षणिक पात्रता - राज्य सरकारच्या नियमानुसार


एकूण जागा - 18


ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज पाठवायचा आहे.


नोकरीचं ठिकाण - मुंबई


अर्ज पाठवण्याचा पत्ता - डॉ. आंबेडकर कॉलेज ऑफ लॉ, टिळक रोड, वडाळा पश्चिम, वडाळा, मुंबई, महाराष्ट्र- ४०००३१


अर्ज करण्याची शेवटची तारीख - 22 जुलै 2022


तपशील - ambedkarlawcollege.in