State Bank of India Clerk Recruitment 2022 : बँकेत नोकरी करायची इच्छा असणाऱ्यांसाठी चांगली बातमी आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI Recruitment) लवकरच लिपिक पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी करणार आहे. या भरती अंतर्गत स्टेट बँक ऑफ इंडिया लिपिक पदांसाठी भरती करणार आहे. इच्छुक उमेदवार या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी अधिकृत साइट sbi.co.in वर जाऊन नोंदणी करू शकतात. याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. लवकरच याची अधिसूचना जारी होण्याची शक्यता आहे. यासाठी इच्छुक उमेदवारांनी अधिकृत साईटवर लक्ष ठेवावं.
येथे अर्ज करू शकता
या भरतीसाठी अर्ज करण्यास इच्छुक उमेदवार कोणत्याही क्षेत्रातील पदवीधर असणे आवश्यक आहे. अर्ज करण्यास इच्छुक उमेदवारांचं वय 20 ते 28 वर्षे दरम्यान असावे. जे उमेदवार SBI JA Pre Exam 2022 साठी पात्र ठरतील त्यांना SBI Clerk Mains Exam 2022 साठी द्यावी लागेल.
निवड प्रक्रिया
या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची निवड प्राथमिक परीक्षा आणि मुख्य परीक्षेद्वारे केली जाईल. या परीक्षेत एकूण 100 प्रश्न विचारले जातील. ही परीक्षा 100 गुणांची असेल, ज्यासाठी उमेदवारांना एक तासाचा वेळ दिला जाईल. उमेदवारांनी या भरतीशी संबंधित तारखा आणि इतर आवश्यक माहितीसाठी अधिकृत साइटवर लक्ष ठेवावं.
योग्य पुस्तके निवडा
इच्छुक उमेदवारांनी या भरतीसाठी आजपासूनच तयारीला सुरुवात करा. या परीक्षेची चांगली तयारी करण्यासाठी सर्वप्रथम उमेदवारांनी अभ्यासक्रम नीट समजून घ्यावा. अभ्यासासाठी योग्य पुस्तकं आणि मार्गदर्शन घ्या. स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) लिपिक परीक्षेत यश मिळवण्यासाठी योग्य साहित्य निवडा आणि त्याच्या आधारे तयारी करा.
महत्त्वाच्या इतर बातम्या