SBI Clerk Recruitment 2022 : बँकेच्या नोकरीची तयारी करणारे विद्यार्थी SBI लिपिक आणि SBI PO भरती 2022 ची आतुरतेने वाट पाहत आहेत. मात्र लवकरात लवकर अधिसूचना निघेल, अशी अपेक्षा आहे. SBI च्या ट्रेंडनुसार, SBI लिपिक भरतीची अधिसूचना दरवर्षी जानेवारी ते एप्रिल दरम्यान प्रसिद्ध केली जाते. यावर्षी देखील SBI लिपिक भरती 2022 ची अधिसूचना एप्रिल महिन्यात प्रसिद्ध होईल अशी अपेक्षा आहे. तर SBI लिपिक भरती प्राथमिक परीक्षा 2022 जून-जुलै दरम्यान आयोजित केली जाण्याची शक्यता आहे. मात्र, अद्याप लिपिकाची अधिसूचना काढण्यात आलेली नाही. परंतु लवकरच SBI लिपिक भरती अधिसूचना जारी करेल अशी अपेक्षा आहे.


SBI लिपिक परीक्षा पॅटर्न 


ही परीक्षा दोन टप्प्यात घेतली जाते. सर्व प्रथम उमेदवारांना पूर्व परीक्षा द्यावी लागेल. प्रिलिममध्ये निवडलेले उमेदवार मुख्य परीक्षेला बसण्यास पात्र असतील. लक्षात ठेवा की, SBI लिपिक परीक्षेत मुलाखतीची फेरी नसते. 


पूर्वपरीक्षा


SBI क्लर्क प्रिलिम्स परीक्षेत एकूण 100 प्रश्न विचारले जातात. प्रत्येक प्रश्न एक नंबरचा असतो म्हणजे, एकूण 100 गुणांचा पेपर तयार केला जातो. यामध्ये इंग्रजी भाषेतून 30 प्रश्न, क्वांटिटेटिव्ह अ‍ॅप्टिट्यूड (QA) मधून 35 प्रश्न आणि तर्कक्षमतेतून 35 प्रश्न विचारले जातात. या परीक्षेसाठी उमेदवारांना 60 मिनिटे मिळतात.


मुख्य परीक्षा


स्टेट बँक ऑफ इंडिया क्लर्क प्रिलिम्स परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना मुख्य परीक्षेला बसावे लागेल. मुख्य परीक्षेत 4 विषय असतात. यात रिझनिंग आणि कॉम्प्युटर अ‍ॅप्टिट्यूडचे 50 प्रश्न आणि या विषयातील 60 गुण असतात. इंग्रजी विषयातून 40 प्रश्न विचारले जातात आणि प्रत्येक प्रश्न एक गुणाचा असतो. QA मधून 50 गुणांसाठी 50 प्रश्न विचारले जातात आणि आर्थिक जागरूकता विषयातून 50 प्रश्न विचारले जातात. अशा परिस्थितीत, मुख्य परीक्षेत एकूण 190 प्रश्न विचारले जातात आणि हा पेपर पूर्ण 200 गुणांचा असतो. कृपया लक्षात घ्या की, ही परीक्षा 2 तास 40 मिनिटांची असते.


शैक्षणिक पात्रता


कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातील पदवीधर विद्यार्थी किंवा अंतिम वर्ष/सेमिस्टरचे विद्यार्थी SBI लिपिक भर्ती 2022 साठी अर्ज करू शकतात.


वयोमर्यादा 


SBI लिपिक भरती 2022 साठी उमेदवारांचे वय किमान 20 वर्षे आणि कमाल 28 वर्ष असावं.


महत्त्वाच्या इतर बातम्या :