मुंबई : अयोध्येतील  (Ayodhya)  राम मंदिराच्या (Ram Mandir)  प्राणप्रतिष्ठापनेची तयारी जोरदार सुरु आहे. या सोहळ्याचे निमंत्रण वाटण्याचे काम अनेक दिवसांपासून सुरु आहे. या सोहळ्यानिमित्त संपूर्ण राममय वातावरण झाले आहे. या सोहळ्याला उपस्थित रहाण्यासाठी बॉलिवूडसह उद्योग जगातील कोणती उद्योजक घराणी उपस्थित रहाणार आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे  लालबाग (Lalbaug)  परळच नव्हे, तर देशभरातील गणपती बाप्पाच्या भक्तांचं श्रद्धास्थान असलेला आणि नवसाला पावणारा अशी ख्याती असलेला 'लालबागचा राजा'ला  सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला अयोध्येच्या राम मंदिरच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला निमंत्रण देण्यात आले आहे. अयोध्येच्या सोहळ्यासाठी सार्वजनिक मंडळाला निमंत्रण मिळालेले लालबागचा राजा (Lalbaugcha Raja) गणेशोत्सव मंडळ हे देशातील एकमेव मंडळ आहे. 


अयोध्येतील राममंदिर उ‌द्घाटन आणि मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळ्याकरता    लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला विशेष निमंत्रण आले आहे. विश्व हिंदू परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी उत्सव मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब कांबळे आणि मानद सचिव सुधीर साळवी यांना लालबाग येथील मंडळाच्या कार्यालयात भेट घेऊन प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण दिले आहे.  लालबागच्या राजाची नवसाला पावणारा गणपती अशी देखील ख्याती आहे. त्यामुळे लालबागच्या राजाच्या चरणी लाखोंच्या संख्येने भाविक दर्शनासाठी येत असतात. 


लालबागच्या राजाची नवसाला पावणारा गणपती अशी ख्याती


लालबागचा (Lalbaug) गणेशोत्सव संपूर्ण देशभरात प्रसिद्ध आहे. देशभरातून अनेक भाविक लालबागच्या राज्याच्या दर्शनासाठी हजेरी लावत असतात. त्यामुळे लालबागमध्ये भाविकांची मोठी गर्दी होत असते.  गणेशोत्सवात अवघ्या देशाच्या नजरा  लालबागच्या गणेशोत्सवाकडे असतात.   देशभरात प्रसिद्ध असलेला लालबागचा राजाच्या राममंदिराचा देखावा उभारला होता. मुंबईतील गणेशोत्सव हा देशातीलच नाही तर परदेशातील नागरिकांचा देखील उत्सुकतेचा विषय आहे.  लालबागच्या राजाचं आणि भाविकांचं एक खास नातं आहे. लालबागच्या राजाच्या चरणी केला जाणारा नवस हा पूर्ण होतो, अशी देखील मान्यता आहे.


सोहळ्यासाठी येणाऱ्या पाहुण्यासाठी अयोध्यानगरी सज्ज


साहित्य, कला, विज्ञान, समाजजीवनात  तुलनीय योगदान देणाऱ्या व्यक्ती नोंदणीकृत राजकीय पक्षांचे अध्यक्ष, रामजन्मभूमी खटल्यात
योगदान देणारे , रामजन्मभूमी खटल्यातील वकील, पक्षकार या सर्वांनाच निमंत्रण देण्यात आले आहे. 22 जानेवारीला राममंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न होणार आहे. सोहळ्यासाठी येणाऱ्या पाहुण्यासाठी अयोध्यानगरी सज्ज झाली आहे प्राणप्रतिष्ठेआधी सुरु झालेल्या पूजाविधी करण्यात येत आहे. प्रभू श्रीरामाच्या स्वागतासाठी राममंदिर फुलांनी आणि विद्युत रोषणाईनं सजलंय. राममंदिराची मूर्ती मंदिरातील गाभाऱ्यात विराजमान झाली आहे.