Job Majha : अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या शोधात आहेत. मात्र, कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच 'एबीपी माझा'ने पुढाकार घेत, नोकरीची संधी कुठे आहेत याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुण नोकरीसाठी या ठिकाणी अर्ज करु शकतील.
अनेक तरुण सरकारी नोकरी मिळविण्यासाठी प्रयत्न करत असतात. अनेकदा वेळीच माहिती न मिळाल्यामुळे नोकरीची संधी हातातून जाते. त्यामुळेच नोकरीच्या शोधात असलेल्या तरुण-तरुणींसाठी एबीपी माझा खाजगी आणि सरकारी क्षेत्रातील नोकरीसंबंधातील माहिती जॉब माझा या विशेष कॅटेगरीमध्ये दररोज प्रकाशिक करतं. वेगवेगळ्या कंपन्या, संस्थांतील नोकर भरतीबाबत जाणून घेण्यासाठी एबीपी माझाच्या वेबसाईटला नक्की भेट द्या. पाहूयात वेगवेगळ्या क्षेत्रांतील भरतीसंदर्भात...
IREL (इंडियन रेअर अर्थ लिमिटेड) येथे विविध पदांसाठी भरती होत आहे.
पोस्ट - पदवीधर ट्रेनी (फायनान्स)
शैक्षणिक पात्रता - CA इंटरमीडिएट/ CMA इंटरमीडिएट किंवा 60% गुणांसह B.Com.
एकूण जागा - 7
पोस्ट - पदवीधर ट्रेनी (HR)
शैक्षणिक पात्रता - कोणत्याही शाखेतून पदवीधर
एकूण जागा - 5
-----------------------------------------------------------------------
पोस्ट - डिप्लोमा ट्रेनी (टेक्निकल)
शैक्षणिक पात्रता - माइनिंग/केमिकल/मेकॅनिकल/इलेक्
एकूण जागा - 19
---------------------
पोस्ट - ज्युनियर सुपरवायजर (राजभाषा)
शैक्षणिक पात्रता - पदव्युत्तर पदवी, 1 वर्षाचा अनुभव
एकूण जागा - 3
पोस्ट - पर्सनल सेक्रेटरी
शैक्षणिक पात्रता - इंग्रजी विषयासह कोणत्याही शाखेतील पदवी, इंग्रजी टायपिंग ४० श.प्र.मि., MS Office, १ वर्षाचा अनुभव
एकूण जागा - 2
-----------------------------------------------------------
पोस्ट - ट्रेड्समन ट्रेनी (ITI)
शैक्षणिक पात्रता - 10वी उत्तीर्ण, ITI /NAC (फिटर/इलेक्ट्रिशियन/अटेंडंट ऑपरेटर – केमिकल प्लांट/इन्स्ट्रुमेंटेशन) किंवा 50% गुणांसह 12 वी परीक्षा उत्तीर्ण, 2 वर्षांचा अनुभव
एकूण जागा - 56
संपूर्ण देशभरात ही भरती होत असून ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख - 7 जुलै 2022
तपशील - www.irel.co.in (या वेबसाईटवर गेल्यावर careers वर क्लिक करा. Vacancy Circular/Notice- Advt. No.CO/HRM/09/2022 या लिंकमध्ये detailed advertisement वर क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)
-----------------------------------------------------------------------------------------------
आर्मी लॉ कॉलेज, पुणे
पोस्ट - सहाय्यक प्राध्यापक, ग्रंथपाल
शैक्षणिक पात्रता - LLM/ MBA/ MA
एकूण जागा - 10 (यात सहाय्यक प्राध्यापक पदासाठी 9, ग्रंथपालसाठी 1 जागा आहे.
अर्ज पाठवण्याचा ईमेल आहे.- army law college pune@gmail.com with copy at principal.alc@awesindia.
अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख - 30 जून 2022
तपशील - alcpune.com (या वेबसाईटवर गेल्यावर notices मध्ये advertisement & tender वर क्लिक करा. faculty job vacancies मध्ये तुम्हाला संबंधित पोस्टसंदर्भातली जाहिरात दिसेल. क्लिक करा. तुम्हाला विस्ताराने माहिती मिळेल.)
महत्वाच्या बातम्या :