Power Grid Bharti: तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी. पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडनं भरतीची अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार संस्थेत अनेक पदांवर भरती होणार आहे. पॉवरग्रिड powergrid.in या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात. या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 14 जानेवारी निश्चित करण्यात आली आहे. या भरती मोहिमेत एकूण 23 पदं भरली जाणार आहेत.


पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड या मोहिमेद्वारे डेप्युटी मॅनेजरच्या 13, सहाय्यक व्यवस्थापकाच्या 10 पदांची भरती केली जाणार आहे. या भरतीशी संबंधित पात्रता तपासण्यासाठी उमेदवार अधिकृत अधिसूचनेची मदत घेऊ शकतात.


कशी केली जाणार निवड?


पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडनं जारी केलेल्या भरती अंतर्गत असलेल्या पदांवर उमेदवारांच्या निवडीसाठी वैयक्तिक मुलाखत घेतली जाईल. निवडलेल्या उमेदवारांना नोकरी मिळवण्यासाठी अंतिम मुलाखतीत पास होणं आवश्यक असेल. 


अर्ज शुल्क 


भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांना अर्ज शुल्क भरावं लागेल. या मोहिमेसाठी उमेदवारांना अर्ज फी म्हणून 500 रुपये शुल्क भरावं लागणार आहे. SC/ST/PWBD/Ex-SM उमेदवारांना फी भरण्यापासून सूट देण्यात आली आहे. भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, उमेदवार अधिकृत वेबसाईट तपासू शकतात.


या भरतीसाठी अर्ज कसा कराल? 


दिल्ली विद्यापीठाच्या शहीद भगतसिंह कॉलेजनं सहाय्यक प्राध्यापकांच्या 88 रिक्त पदांच्या भरतीसाठी अर्ज आमंत्रित केले आहेत. या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू आहे. या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 20 जानेवारी 2023 निश्चित करण्यात आली आहे. भरतीसाठी अर्ज करण्यासाठी, उमेदवार अधिकृत वेबसाईट colrec.uod.ac.in वर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात.


अनेक तरुण सरकारी नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्न करत असतात. अनेकदा वेळीच माहिती न मिळाल्यामुळे नोकरीची संधी हातातून जाते. त्यामुळेच नोकरीच्या शोधात असलेल्या तरुण-तरुणींसाठी एबीपी माझा खाजगी आणि सरकारी क्षेत्रातील नोकरीसंबंधातील माहिती जॉब माझा या विशेष कॅटेगरीमध्ये दररोज प्रकाशिक करतं. वेगवेगळ्या कंपन्या, संस्थांतील नोकर भरतीबाबत जाणून घेण्यासाठी एबीपी माझाच्या वेबसाईटला नक्की भेट द्या.  


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Government Jobs: सेंट्रल सिल्क बोर्डात नोकरीची संधी, 145 जागांवर निघाली भरती, आजच करा अर्ज