नवी मुंबई : पनवेल महानगरपालिकेत (Panvel Municipal Corporation) काम करण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली असून सध्या पनवेळ महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु करण्यात आलीये. सध्या सरळसेवेच्या 41 संवर्गातील 377 पदे भरली जाणार आहेत. त्यासाठी कर्मचाऱ्यांची भरती (Recruitment) परीक्षा उद्यापासून म्हणजेच शुक्रवार 8 डिसेंबर रोजी सुरु होणार आहे. ही परीक्षा 12 डिसेंबरपर्यंत सुरु राहणार आहे.  यासाठी महाराष्ट्रातून 55 हजार 214 अर्ज प्राप्त झाले आहेत. 


राज्यातील सहा विभागांमध्ये 21 जिल्ह्यात एकूण 57 परीक्षा केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. या केंद्रांवर पालिकेकडून पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलाय. त्याचप्रमाणे वैद्यकीय सुविधा देखील उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याची माहिती, आयुक्त गणेश देशमुख यांनी दिली. तसेच परिक्षा घेण्यासाठी महापालिकेने टाटा कन्सल्टंसी सर्व्हिसेस लिमिटेड यांची नियुक्ती केली असल्याचं सांगण्यात आलं आहे. 


परीक्षा केंद्रांवर घेण्यात आलेली खबरदारी 


परीक्षा केंद्रांवर घेतलेली खबरदारी म्हणून  केंद्रावर अनुचित प्रकार घडू नये आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याकरिता प्रत्येक  केंद्रावर 4 पोलीस तैनात करण्यात येणार आहे. परीक्षा केंद्रावर उमेदवारांनी कोणत्याही इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा तसेच मोबाईलचा वापर करु नये यासाठी जॅमर बसविण्यात येणार आहे.सदर परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी राजपत्रित अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.  21 जिल्हासमन्वयक आणि 57 केंद्र समन्वयक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच सदर अधिकारी यांना सहाय्यक म्हणून 1 लिपिक व 1 शिपाईयांची नियुक्ती करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच सदर प्रत्येक परीक्षा केंद्रावर अत्यावश्यक सेवा म्हणून 1 वैद्यकीय अधिकारी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.


बँकेत काम करण्याची सुवर्णसंधी


 इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया म्हणजेच, IDBI बँकेनं अनेक स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसर पदांसाठी भरती जाहीर केली आहे. नोकरीच्या शोधात असाल तर ही संधी अजिबात सोडू नका. तुमची निवड झाल्यास दरमहा उत्तम वेतन मिळेल. ज्या उमेदवारांना या रिक्त जागांसाठी फॉर्म भरायचा आहे, ते बँकेच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन अर्ज करू शकतात. भरतीसंदर्भात सर्व माहिती जाणून घेण्यासाठी आणि अर्ज करण्यासाठी IDBI बँकेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या - idbibank.in तुम्ही या वेबसाईटवरुन या भरतीचे तपशील जाणून घेऊ शकता.


भरतीसंदर्भातील महत्त्वाच्या तारखा


आयडीबीआय बँकेनं स्पेशलिस्ट कॅडर ऑफिसर पदांसाठी ही भरती जाहीर केली आहे. त्यासाठी अद्याप अर्ज भरण्यास सुरुवात झालेली नाही. नोंदणी 9 डिसेंबर 2023 पासून सुरू होईल आणि फॉर्म भरण्याची अंतिम तारीख 25 डिसेंबर 2023 आहे. अर्ज शुल्क देखील याच तारखांमध्ये भरावं लागेल. त्यामुळे शेवटच्या दिवसापर्यंत थांबू नका, वेळेत अर्ज भरा. 


हेही वाचा :


SCI Recruitment 2023 : सरकारी नोकरीची संधी! अर्ज प्रक्रियेला सुरुवात, 11 डिसेंबर शेवटची तारीख