नवी दिल्ली : देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) हे यांनी नवाब मलिकांना (Nawab Malik) जो पर्यंत आरोप खोटे असल्याचं सिद्ध होत नाही, तोपर्यंत महायुतीच्या सरकारमध्ये त्यांना सामील न करुन घेण्याची विनंती अजित पवारांना (Ajit Pawar) पत्राद्वारे केलीये. फडणवीसांच्या या पत्रावर राष्ट्रवादी शरद पवार (Sharad Pawar) गटाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी प्रतिक्रिया दिली. देवेंद्र फडणवीस हे पत्र न लिहिता अजित पवारांना फोन करुनही सांगू शकत होते. त्यामुळे हे सगळं षडयंत्र असल्याची शंका येत असल्याची प्रतिक्रिया यावेळी सुप्रिया सुळेंनी दिली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक हे सध्या जामिनावर बाहेर आलेले आहेत. राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर अनेक नेत्यांनी आपला मार्ग निवडला. परंतु नवाब मलिकांच्या बाबतीत सातत्याने अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते. मलिक कोणत्या गटात जाणार हा प्रश्न प्रामुख्याने उपस्थित केला जात होता. मलिकांची त्यांची तटस्थपणाची भूमिका जाहीर केल्यानंतर मात्र या चर्चांना काहीसा पू्र्णविराम मिळाला. पण हिवाळी अधिवेशनाच्या माध्यमातून पुन्हा एकदा मलिकांच्या भूमिकेवर चर्चा सुरु झाल्या होत्या. हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी नवाब मलिक सत्ताधारी पक्षाच्या बाकावर सर्वात शेवटी बसले. त्यामुळे नवाब मलिक यांनी अजित पवार गटाला पाठिंबा दिल्याचं स्पष्ट झालं. पण जोपर्यंत ते निर्दोष सिद्ध होत नाहीत, तोपर्यंत त्यांना सरकारमध्ये सामील करुन न घेण्याची विनंती फडणवीसांनी अजित पवारांना केली.
'सुप्रिया सुळे मलिकांच्या पाठिशी उभी'
राष्ट्रवादीचे नेते जेलमध्ये होते तेव्हा मी सर्वांना भेटले. अडचणीच्या काळात सोबत राहावं लागतं. प्रत्येक वेळी आम्ही त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबाच्या सोबत होतो. नवाब मलिकांवर माझा पूर्ण विश्वास असून त्यांच्या मागे सुप्रिया सुळे पूर्ण ताकदीने उभी राहिल, असा विश्वास देखील सुप्रिया सुळे यांनी यावेळी व्यक्त केला.
मलिकांच्या मागे षडयंत्र - सुप्रिया सुळे
आम्ही कुणावर सीबीआय, ईडीचे लावली नाही. सुडाचं राजकारण आम्ही केलं नाही. भारतात सध्या गलिच्छ राजकारण सुरु आहे. त्यामुळे नबाव मलिकांच्या मागे षडयंत्र असल्याची शंका मला येतेय. पण मलिकांवर माझा पूर्ण विश्वास आहे. सध्या भाजप हे पक्ष, लोकांना फोडण्याचं गलिच्छ काम काम करतं. अडवाणींच्या भाजपनं असं सूडाचं राजकारण केलं नाही. पण आता भाजपात असलेली अदृश्य शक्ती हे काम करतेय, अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिली.
हेही वाचा :
फडणवीसांच्या पुढाकाराने सरकार आणलं, त्यांची भूमिका हीच सरकारची भूमिका प्रविण दरेकरांची प्रतिक्रिया