​GRSE Recruitment 2022 : गार्डन रीच शिपबिल्डर्स अँड इंजिनियर्स लिमिटेडनं भरती अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार GRSE मध्ये 50 हून अधिक पदांची भरती केली जाणार आहे. इच्छुक उमेदवारांना या पदांसाठी 28 जुलैपर्यंत अर्ज करता येणार आहे. या पदांसाठी अर्ज करण्यासाठी, उमेदवारांना GRSE ची अधिकृत वेबसाईट grse.in वर जाऊन अर्ज करता येणार आहे. 


रिक्त पदांचा तपशील 


पर्यवेक्षक : 32 पदं
इंजिन टेक्निशियन : 8 पदं
डिझाइन असिस्टंट : 17 पदं
एकूण : 57 पदं


पात्रतेचे निकष 


या भरती प्रक्रियेत वेगवेगळ्या पदांवर भरती केली जाणार आहे. ज्यासाठी शैक्षणिक योग्यता आणि वयोमर्यादेच्या अटी वेगवेगळ्या असणार आहेत. अधिक तपशील जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाईट तपासू शकतात. 


निवड कशी होणार? 


उमेदवारांची निवड 100 मार्कांच्या लेखी परीक्षेनं घेतली जाणार आहे. तसेच, ट्रेड टेस्टच्या आधारे केली जाईल. लेखी परीक्षा कोलकाता आणि रांची येथे घेतली जाईल.


अर्ज शुल्क 


या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी, उमेदवारांना अर्ज शुल्क भरावं लागणार आहे. उमेदवारांना अर्ज फी म्हणून 400 रुपये भरावे लागतील. अर्जदारांनी स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) च्या कोणत्याही शाखेत बँक चलान मोडद्वारे अर्जाची फी जमा केल्यास, 71 रुपयांची बँक फी लागू होईल. ज्यामध्ये, SC/ST/PWBD/अंतर्गत उमेदवारांना अर्ज शुल्क भरण्यापासून सूट देण्यात आली आहे.



अनेक तरुण सरकारी नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्न करत असतात. अनेकदा वेळीच माहिती न मिळाल्यामुळे नोकरीची संधी हातातून जाते. त्यामुळेच नोकरीच्या शोधात असलेल्या तरुण-तरुणींसाठी एबीपी माझा खाजगी आणि सरकारी क्षेत्रातील नोकरीसंबंधातील माहिती जॉब माझा या विशेष कॅटेगरीमध्ये दररोज प्रकाशिक करतं. वेगवेगळ्या कंपन्या, संस्थांतील नोकर भरतीबाबत जाणून घेण्यासाठी एबीपी माझाच्या वेबसाईटला नक्की भेट द्या.