Recruitment : नोकरीच्या शोधात असलेल्या तरूणांसाठी आनंदाची बातमी आहे. देशात विविध क्षेत्रात लवकरच मोठ्या प्रमाणावर नोकरीच्या संधी उपलब्ध होणार आहेत. देशातील सुप्रसिद्ध कर्मचारी आणि एचआर तंत्रज्ञान कंपनी टीम लीजच्या अहवालात याबाबतची माहिती देण्यात आली आहे. या कंपनीने भारतात अनेक क्षेत्रात नोकऱ्या उपलब्ध होणार असल्याचा दावा केला आहे. कंपनीचे सीईओ सुमित सभरवाल यांनी याबाबत माहिती दिली आहे.
"टीम लीज ही कंपनी दर तीन महिन्याला एक सर्व्हे करत असते. या सर्व्हेमध्ये येणाऱ्या तीन महिन्यांमध्ये देशातील रोजगाराची स्थिती काय असेल याचा आढावा घेते. आगामी तीन महिन्यात कोणत्या-कोणत्या क्षेत्रात रोजगार उपलब्ध होणार आहे, याबाबत कंपनी सर्व्हे करते. कंपनीने 22 राज्यांमधून इनपूट मागविले आहेत. यात कंपनीकडून 14 ते 15 क्षेत्रांवर लक्ष्य केंद्रीत करण्यात आले आहे. टीम लीज ही कंपनी एंट्री लेव्हल ते टॉप लेव्हल पर्यंत कोणत्या-कोणत्या क्षेत्रात नोकऱ्या उपलब्ध होतील याबाबतचा सर्व्हे करते, अशी माहिती सुमित सभरवाल यांनी दिली.
सुमित सभरवाल यांनी सांगितले की, टीम लीज कंपनीने यावेळी केलेल्या सर्व्हेतून कॉर्पोरेट क्षेत्रात जास्त सकारात्मक स्थिती असल्याची माहिती मिळाली आहे. कोरोना महामारीच्या परिस्थितीमुळे गेल्या दोन वर्षांमध्ये अनेक कंपन्यांचे मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे कंपन्यांनी कर्मचाऱ्यांची मोठ्या प्रमाणात कपात केली होती. परंतु, आगामी काळात याच कंपन्या मोठ्या प्रमाणात नोकर भरती करणार आहेत.
कोणत्या क्षेत्रात जास्त संधी?
आगामी तीन महिन्यात ई- कॉमर्स, टेक्नोलॉजी, शैक्षणिक क्षेत्रात रोजगाराच्या चांगल्या संधी निर्माण होतील. बंगळूरू, चैन्नई, हैदराबाद, मुंबई आणि दिल्ली सारख्या शहरात रोजगाराच्या संधी निर्णाम होतील, असे सुमित सभरवाल म्हणाले.
महत्वाच्या बातम्या