Motivational Viral Story : बेरोजगारी (Unemployment) किती दुःखद आणि कठीण असते, हे फक्त बेरोजगारांनाच माहीत असते. बेरोजगारांना नोकरी मिळवण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात. यानंतरही लोकांना लवकर नोकऱ्या मिळत नाहीत. अशातच जर समजा, तुम्ही नोकरी मिळवण्यासाठी खूप प्रयत्न करत आहात आणि अचानक तुम्हाला तुमच्या स्वप्नातील नोकरीची ऑफर मिळाली तर? तुमचा आनंद गगनात मावणार नाही. अशीच एक घटना एका तरुणासोबत घडली आहे. यामुळे हा तरुण सोशल मीडियावर व्हायरलही झाला. (Viral Story)
नोकरी मिळवण्यासाठी एक तरुण फलक घेऊन मेट्रो स्टेशनवर पोहोचला
असाच काहीसा प्रकार लंडनमध्ये राहणाऱ्या एका तरुणासोबत घडला. नोकरी मिळवण्यासाठी त्याने असे काम केले, ज्याचा विचारही अनेकजण करू शकत नाहीत. या 24 वर्षीय बेरोजगार तरुणाला नोकरी मिळवण्याची एक उत्तम कल्पना सुचली. हा तरुण हातात बायोडेटा आणि फलक घेऊन मेट्रो स्टेशनवर पोहोचला. या अनोख्या युक्तीमुळे अवघ्या 3 तासात तरुणाला नोकरी मिळाली. एवढेच नाही तर हा तरुण सोशल मीडियावर व्हायरलही झाला. आता तरुणाची कहाणी लोकांना खूप प्रेरणा देत आहे.
अनेक महिन्यांपासून नोकरीच्या शोधात
24 वर्षीय हैदर मलिक गेल्या अनेक महिन्यांपासून नोकरीच्या शोधात होता. झूम कॉलच्या माध्यमातून त्यांनी अनेक मुलाखती दिल्या, मात्र त्याला यश मिळत नव्हते. यानंतर नोकरी शोधण्याचा वेगळा मार्ग शोधून हैदर कंटाळला. त्याने एका स्टेशनरी दुकानातून एक बोर्ड विकत घेतला, ज्यावर त्याने त्याच्या बायोडाटा आणि लिंक्डइन प्रोफाइलचा QR कोड पेस्ट केला, जेणेकरून लोकांना त्याचा CV आणि LinkedIn प्रोफाइल ऍक्सेस करता येईल.
अवघ्या तीन तासात मुलाखतीसाठी कॉल आला
या तरुणाने आपल्याला नोकरीची गरज असल्याचे फलकावर लिहिले होते. हैदरने सांगितले की, तो सकाळी सात वाजताच मेट्रो स्टेशनवर पोहोचला. स्टेशनवर उभा असताना सुरुवातीला अनेकांनी त्याला आपले कार्ड दिले. याशिवाय अनेक जण त्याच्याशी फोनवर बोलले. हैदरने सांगितले की, या अनोख्या पद्धतीबाबत सुरुवातीला त्याला थोडे विचित्र वाटले, पण जेव्हा तीन तासांत मुलाखतीसाठी फोन आला, तेव्हा त्यांचा विश्वासच बसला नाही.
...आणि त्याला एक मेसेज आला
हैदरने सांगितले की, 9.30 च्या सुमारास त्याला एक मेसेज आला. या मेसेजमध्ये त्यांना कॅनरी वार्फ ग्रुपमध्ये ट्रेझरी अॅनालिस्ट या पदासाठी मुलाखतीसाठी बोलावण्यात आले होते. त्यानंतर तो वेळेवर तेथे पोहोचला. मुलाखतीच्या दोन फेऱ्यांनंतर नोकरी मिळाल्याचे मलिकने सांगितले. यानंतर हैदरच्या आनंदाला पारावार उरला नाही.
वडिलांकडून मिळाली नोकरी शोधण्याची अनोखी कल्पना
हैदरने सांगितले की, त्याला नोकरी शोधण्याची ही अनोखी कल्पना त्याचे वडील मेहमूद मलिक यांच्याकडून मिळाली. त्यांचे वडील लहानपणी पाकिस्तानातून ब्रिटनमध्ये आले होते. अशा प्रकारे नोकरी शोधण्याची कल्पना त्याच्या वडिलांनीच दिली. हैदर म्हणाला की, सुरुवातीला त्याला थोडी अस्वस्थता जाणवत होती, कारण तो रिकाम्या हाताने उभा होता. यानंतर, त्याच्या बॅगमधून सीव्ही काढून, त्याने जवळून जाणाऱ्या लोकांना गुड मॉर्निंगच्या शुभेच्छा देण्यास सुरुवात केली. त्याचा हा प्रकार पाहून अनेकांना हसूही येत होते.
इतर महत्वाच्या बातम्या
Viral Video : 'फॉरेनची पाटलीण' चक्क शेतात करतेय कांदा पेरणी! सासू झाली खूश, नेटकरी आश्चर्यचकीत!