Ministry of External Affairs Recruitment 2022 : परराष्ट्र मंत्रालयात (​Ministry of External Affairs) नोकरीची संधी (Governmant Job) आहे. इच्छुकांनी या संधीचा नक्कीच लाभ घ्यावा. परराष्ट्र मंत्रालयाने भरती अधिसूचना जारी केली आहे. परराष्ट्र मंत्रालय योग शिकवण्यासाठी प्रशिक्षित योग प्रशिक्षकाची नियुक्ती करण्यात येईल. सुरुवातीला एक वर्षाच्या करारावर उमेदवारांची भरती केली जाईल. त्यानंतर उमेदवाराच्या कामगिरीवर अवलंबून एक वर्षाच्या पुढील कालावधीसाठी वाढविला जाऊ शकतो. याग प्रशिक्षकांनी मंत्रालयाच्या सर्व योग क्रियांमध्ये सक्रिय सहभाग घेणे आवश्यक आहे.


रिक्त जागा तपशील


परराष्ट्र मंत्रालयाकडून या भरतीद्वारे एकूण तीन पदांची भरती केली जाणार आहे.


भरतीसाठी आवश्यक पात्रता


या भरतीसाठी इच्छुक उमेदवाराने मान्यताप्राप्त संस्था किंवा विद्यापीठातून योग क्षेत्रात पीएचडी किंवा मास्टर्स शिक्षण पूर्ण केलेले असावे. मान्यताप्राप्त विद्यापीठातून योग करण्याचा किमान तीन वर्षांचा अनुभव असावा.


वयोमर्यादा


योग प्रशिक्षक पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 25 ते 45 वर्षे दरम्यान असावे.


पगार किती असेल?


प्रशिक्षकाला एकूण मासिक पगार 20 हजार रुपयांच्या आत असेल. त्याहून अधिक नाही.


अशी असेल निवड प्रक्रिया


या पदांसाठी निवडलेल्या उमेदवारांना मुलाखत आणि प्रात्यक्षिक चाचणीसाठी बोलावले जाईल. त्यानंतरच उमेदवारांची अंतिम निवड केली जाईल.


अशाप्रकारे करा अर्ज 


इच्छुक उमेदवार त्यांचे अर्ज संलग्न नमुन्यात अमित, कल्याण अधिकारी, परराष्ट्र मंत्रालय यांच्या ईमेलद्वारे पाठवू शकतात. उमेदवाराने अर्जाचा फॉर्म welfare@mea.gov.in वर 31 ऑक्टोबर 2022 रोजी (सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत) पाठवायचा आहे. शेवटच्या तारखेनंतर प्राप्त झालेल्या कोणत्याही अर्ज गृहित धरला जाणार नाही.


अनेकजण सध्या चांगल्या नोकरीच्या शोधात आहेत. मात्र, कधी-कधी पात्रता, शिक्षण असून देखील माहितीच्या अभावी ही संधी हुकते. त्यामुळेच 'एबीपी माझा'ने पुढाकार घेत, नोकरीची संधी कुठे आहेत याची माहिती गरजूंपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. त्यामुळे नोकरीची गरज असलेले तरुण नोकरीसाठी या ठिकाणी अर्ज करु शकतील.


* येथेही नोकरीची संधी : राज्यातील 75 हजार जागांची नोकर भरती


देशाचा अमृत महोत्सवी वर्ष साजरा केला जात आहे. देशाच्या  स्वतंत्र्याला 75 वर्ष पूर्ण होत आहे. या पार्श्वभूमीवरी राज्यात 75 हजार नोकर भरती केली जाणार असल्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. राज्यात शासकीय कर्मचारी यांची 2 लाख 44 हजार 405 जागा रिक्त आहेत. एकूण पदसंख्येच्या 23 टक्के जागा रिक्त आहेत. 75 हजार नोकर भरती करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. 


अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा


महत्त्वाच्या इतर बातम्या


Job Majha : दहावी पास उमेदवारांसाठी नोकरीची संधी,  एअर इंडिया एअर सर्विसेसमध्ये भरती